शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

कामाख्या देवीची अशी पूजा घालतो की शिंदे सरकार आउट होईल; चंद्रकांत खैरेंचा चमत्कारिक दावा

By सुमेध उघडे | Updated: November 23, 2022 16:46 IST

हे आता कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. मी कामाख्या देवीला मागील २२ वर्षांपासून जात आहे.

औरंगाबाद : मी २२ वर्षांपासून कामाख्या देवीची पूजा करतो. आमचे सरकार गेल्यानंतर मी तिथे पूजा घातली. यामुळेच आता शिंदे सरकार अडचणीत आले आहे. आता मी पुन्हा अशी पूजा घालणार की हे सर्व आउट होतील, असा चमत्कारिक दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

शिंदे सरकार पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा आहे. यावरून खैरे टीका करत आहेत. तर दुसरीकडे खैरे यांना शिंदे गटाने गुवाहाटीला येण्याची खुली ऑफर दिली आहे. खैरे येणार असतील, त्यांनी मला निरोप पाठवला तर औरंगाबादला येऊन त्यांना घेऊन जातो असे मंत्री उदय सामंत म्हटल्याने चर्चेला तोंड फुटले आहे. शिंदे गटाने दिलेल्या या ऑफरवर आता खैरे यांनी निशाणा साधला आहे. 

खैरे म्हणाले, हे आता कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. मी कामाख्या देवीला मागील २२ वर्षांपासून जात आहे. मागे हे सर्व जाऊन आल्यानंतर मी जाऊन माझ्या पद्धतीने पूजा केली. म्हणून शिंदे सरकार अडचणीत आले आहे. आता यांना जाऊन येऊ द्या, मी त्यानंतर पुन्हा जाईल. कामाख्याला देवीला मी खूप मानणारा माणूस आहे. तेथे मी श्रद्धेने जातो, स्वार्थाने नाही जात. सरकार वाचविण्यासाठी शिंदे गट तिथे जात आहे. आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांचे विजय व्हावा म्हणून मी जात आहोत. तुम्ही एकदा जाऊन तर येऊ द्या त्यानंतर मी तिथे अशी पूजा घालतो की हे सर्व आउट होतील, असा चमत्कारिक दावा खैरे यांनी केला आहे.

सरकार टिकणार नाही जास्त मी कडवट शिवसैनिक आहे. मी कुठेही जाणार नाही. माझ्या जिल्ह्यातील ५ आमदार गद्दार झाले. मी अनेकवेळा सांगूनही ते गेले. मी यांच्याविरोधात भांडत आहे. उद्धव ठाकरेंसोबत जनता आहे. आम्ही मरेपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहू. हे खोक्यांसाठी, मंत्रिपदासाठी गेले असतील, पण हे टिकणार नाही जास्त. २९, ३० नोव्हेंबरला बघा काय होते ते. मी देखील २७ तारखेला पूजा घालणार आहे. दक्षिण मुखी मारुतीला हवन करू, त्यानंतर पहा काय होते ते, असा इशाराही खैरे यांनी दिला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंतChandrakant Khaireचंद्रकांत खैरेguwahati-pcगौहती