शिल्लेगावचे उपकेंद्र कर्मचाऱ्यांअभावी ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:06 IST2021-05-07T04:06:10+5:302021-05-07T04:06:10+5:30
शिल्लेगाव आरोग्य उपकेंद्र परिसरातील सात ते आठ गावांसह वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून बनविण्यात आले होते. ...

शिल्लेगावचे उपकेंद्र कर्मचाऱ्यांअभावी ओस
शिल्लेगाव आरोग्य उपकेंद्र परिसरातील सात ते आठ गावांसह वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून बनविण्यात आले होते. मात्र, या केंद्रात डॉक्टर, आरोग्य सेविका नसल्यामुळे ते ओस पडले आहे. इमारतीला गाजर गवताने वेढले असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वारंवार ग्रामपंचायत, ग्रामस्थ कायम स्वरूपी डॉक्टर, आरोग्य सेविका नियुक्ती करावी, अशी मागणी करत असताना आरोग्य विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन येथे कायमस्वरूपी कर्मचारी देण्याची मागणी उपसरपंच लक्ष्मण चंदेल, सोमनाथ वाघ, शुभम बोऱ्हाडे यांनी केली आहे.
कोट
वरिष्ठांकडे मागणी करणार
शिल्लेगाव येथील ग्रामपंचायतीने अर्ज दिलेला आहे. गाजगाव येथील आरोग्य सेविकेला तेथील अतिरिक्त पदभार दिला आहे. एक कर्मचारी तेथे असतो. मात्र, कोविडमुळे कामाचा व्याप वाढल्याने कर्मचारी फिरते ठेवावे लागत आहेत. तरी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कर्मचारी वाढविण्याची मागणी करणार आहे.
-डॉ. चित्रा बिऱ्हाडे, वैद्यकीय अधिकारी, सिद्धनाथ वाडगाव.