ग्रामीण भागात प्रचार शिगेला

By Admin | Updated: October 6, 2014 00:12 IST2014-10-05T23:57:20+5:302014-10-06T00:12:42+5:30

गंगाराम आढाव , जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात सर्वच उमेदवारांच्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. काही मतदार संघात विकास कामांचा मुद्दा गाजत आहे.

Shigella publicity in rural areas | ग्रामीण भागात प्रचार शिगेला

ग्रामीण भागात प्रचार शिगेला


गंगाराम आढाव , जालना
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात सर्वच उमेदवारांच्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. काही मतदार संघात विकास कामांचा मुद्दा गाजत आहे. काही मतदार संघात आरोप-प्रत्यारोप होत आहे. त्यामुळे मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
जालना जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघ आहे. एकूण ७७ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहे. युती व आघाडी तुटल्याने पाच ही मतदार संघात काँग्रस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व मनसे या पाच प्रमुख पक्षांसह काही घटक पक्षांनी केलेली तिसरी आघाडी, बसपा व अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत आली आहे.
सर्वच उमेदवारांनी आपले लक्ष शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाकडे केंद्रीत केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जत्रेचे स्वरूप आले आहे. एका उमेदवाराची प्रचार रॅली झाली की लगेच दुसऱ्या उमेदवाराची रॅली गावात दाखल होते. एकाची सभा झाली की दुसऱ्याची. हा नित्यक्र म ग्रामीण भागात मागील चार दिवसांपासून सुरू झालेला आहे. काही उमेदवारांनी तर प्रचारासाठी चारचाकी वाहनाला चौहो बाजूनी फलक लावून रथ तयार केला. व त्यावरील भोंग्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू केलेला आहे. प्रत्येक गावात दररोज वेगवेगळ्या पक्षाचे हे रथ प्रचारासाठी धडकत आहे. काही वेळा तर हे रथ समोरासमोर येत असल्याने दोन्हींच्या आवाजाने एकच गोंगाट होत आहे.
राष्ट्रीय नेत्यांची भाषणे
राजकीय पक्षाच्या काही प्रमुख उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या भाषणाच्या ध्वनीफित, तसेच एलसीडीद्वारे काही गाजलेल्या सभा मधील भाषणाच्या चित्रफितीही दाखवून मतदारांची गर्दी ओढून घेत आहे.
आरोप- प्रत्यारोप
जिल्ह्यातील पाच मतदार संघापैकी सर्वाधिक आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी भोकरदन आणि घनसावंगी मतदार संघात होत आहे. या ठिकाणी विद्यमान पुढाऱ्यांवर विरोधी उमेदवारांकडून टीकास्त्र होत असल्याने मतदारांची चांगलीच करमणूक होत आहे. एकूणच ग्रामीण भागातील राजकीय प्रचार चांगलाच रंगात आला आहे.

Web Title: Shigella publicity in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.