मुख्यमंत्र्यांच्या दिशेने भिरकाविली पत्रके!
By Admin | Updated: November 28, 2014 01:17 IST2014-11-28T01:05:07+5:302014-11-28T01:17:40+5:30
औरंगाबाद : भाजपा कामगार मोर्चाच्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने पत्रके फेकून दलितांवरील वाढत्या अन्याय,

मुख्यमंत्र्यांच्या दिशेने भिरकाविली पत्रके!
औरंगाबाद : भाजपा कामगार मोर्चाच्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने पत्रके फेकून दलितांवरील वाढत्या अन्याय, अत्याचाराचा निषेध करण्यात आला. संविधान बचाव समितीच्या निदर्शक कार्यकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
रात्री ८ वाजता संत तुकाराम महाराज नाट्य मंदिरात भाजपाचा सदस्य नोंदणी व कामगार मोर्चा मेळाव्यास सुरूवात झाली. फडणवीस मंचावर आले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईल नंबर सांगितला.
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच अचानक नाट्यमंदिरात आठ-दहा तरुणांचा घोळका आला. कडक पोलीस बंदोबस्त असतानाही ते अगदी मुख्यमंत्र्यांच्या समोर येऊन उभे राहिले व अचानक जवखेडा येथील घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करू लागले. मुख्यमंत्री फडणवीस प्रतिसाद देत म्हणाले की, ‘तुमच्या भावना योग्य आहेत. पद्धत चुकीची असेल. सरकार कारवाई करीतच आहे.’ इकडे निदर्शकांनी आपल्या हातातील पत्रके मुख्यमंत्र्यांच्या दिशेने फेकली.