शौर्यच्या आईने मानले पोलिसांचे आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:04 IST2021-04-13T04:04:36+5:302021-04-13T04:04:36+5:30
अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पोलिसांनी शौर्यची सुखरूप सुटका केल्यामुळे पोलिसांचे आभार शब्दात मांडणे अशक्य आहे. आम्ही आधीच दहा, अकरा वर्षांपूर्वी एक ...

शौर्यच्या आईने मानले पोलिसांचे आभार
अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पोलिसांनी शौर्यची सुखरूप सुटका केल्यामुळे पोलिसांचे आभार शब्दात मांडणे अशक्य आहे. आम्ही आधीच दहा, अकरा वर्षांपूर्वी एक मुलगा गमावला होता. यामुळे आम्ही शौर्यला आमच्यापासून दूर जाऊ देत नाही. असे असताना ही घटना घडली; मात्र एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले काम आमच्यासाठी अविस्मरणीय आहे.
- पौर्णिमा हिरेमठ (शौर्यची आई )
================
चाकू, मोबाइल आणि दुचाकी जप्त
शौर्यचे अपहरण केल्यावर त्याचे बरेवाईट करण्याच्या उद्देशाने आरोपीने स्वतःजवळ चाकू ठेवला होता. पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा हा चाकू, दोन मोबाइल जप्त केले. शौर्यचे अपहरण करण्यासाठी वापरलेली दुचाकीही पोलिसांना त्याच्या घराजवळ आढळली. शिवाय तो शौर्यसह दुचाकीवर आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.