दारूच्या पैशासाठी धारदार शस्त्राने वार
By Admin | Updated: May 3, 2015 00:58 IST2015-05-03T00:54:35+5:302015-05-03T00:58:47+5:30
नळदर्ग : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून, वस्ताऱ्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून एकास गंभीर जखमी केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे गुरूवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

दारूच्या पैशासाठी धारदार शस्त्राने वार
नळदर्ग : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून, वस्ताऱ्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून एकास गंभीर जखमी केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे गुरूवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अणदूर येथील सुहास महादेव घंटे हे गुरूवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अणदूर शहरातील हुतात्मा स्मारकाजवळून जात होते. यावेळी तेथे बसलेले विनय अशोक इंगोले, लखन दिलीप देडे, मकरंद राजकुमार भालकरे (सर्व रा. अणदूर) यांनी संगनमताने सुहास घंटे यांना बोलावून घेऊन दारू पिण्यासाठी पैसे मागितले. घंटे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने विनय इंगोले यांनी वस्ताऱ्यासारख्या धारदार शस्त्राने घंटे यांच्या छातीवर वार करून जखमी केले. याप्रकरणी घंटे यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हेकॉ गोपाळ घारगे करीत आहेत. (वार्ताहर)