शरद पवार यांचा आज नागरी सत्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:11 IST2017-07-29T01:11:20+5:302017-07-29T01:11:20+5:30

औरंगाबाद : माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दि. २९ जुलै रोजी त्यांचा मराठवाड्याच्या वतीने नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे

Sharad Pawar to be felicitated today | शरद पवार यांचा आज नागरी सत्कार सोहळा

शरद पवार यांचा आज नागरी सत्कार सोहळा

औरंगाबाद : माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दि. २९ जुलै रोजी त्यांचा मराठवाड्याच्या वतीने नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ३ वा. देवगिरी महाविद्यालयात केंद्रीय मार्ग परिवहन व महामार्ग, नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होईल. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहील. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, खा. चंद्रकांत खैरे तसेच मराठवाड्यातील खासदार, आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील. हा सत्कार सोहळा सर्वांसाठी खुला आहे. या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागरी सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, कार्याध्यक्ष आ. सतीश चव्हाण आदींनी केले आहे.

Web Title: Sharad Pawar to be felicitated today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.