मुदखेड नगराध्यक्षपदी शमीम बेगम, उपनगराध्यक्षपदी माधव कदम
By Admin | Updated: August 17, 2014 00:54 IST2014-08-17T00:42:20+5:302014-08-17T00:54:23+5:30
मुदखेड : नगराध्यक्षपदासाठी शमीम बेगम एम. नजीर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. तर उपनगराध्यक्षपदी माधव कदम यांची निवड झाली आहे.

मुदखेड नगराध्यक्षपदी शमीम बेगम, उपनगराध्यक्षपदी माधव कदम
मुदखेड : मुदखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या शमीम बेगम एम. नजीर यांचा एकमेव अर्ज आल्याने सर्वसाधारण सभेत पिठासीन अधिकारी केशव नेटके यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. तर उपनगराध्यक्षपदी माधव कदम यांची निवड झाली आहे.
१६ आॅगस्ट रोजी विशेष सभा झाली. तहसीलदार किरण आंबेकर, मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर किशोर स्वामी, गोविंदराव शिंदे यांची उपस्थिती होती. शमीम बेगम यांच्याकडे मावळते अध्यक्ष सुनील शेटे यांनी पदभार दिला. उपनगराध्यक्ष पदासाठी युवक नेते माधव कदम यांचे एकमेव नाव घोषित झाल्याने अनेकांची नाराजी दूर झाली. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे बजरंग खोडके, बाळू पांचाळ, हकीमसेठ, बंदेअली खाँ, उत्तम चव्हाण, गौस नबीसेठ, एकबाल खुरेशी यांनी स्वागत केले. (वार्ताहर)