शाहू विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला २० हजारांचा दंड

By Admin | Updated: January 24, 2017 23:38 IST2017-01-24T23:36:45+5:302017-01-24T23:38:06+5:30

बीड : पाच क्विंटल जादा तांदूळ साठा आढळल्याप्रकरणी येथील छत्रपती शाहू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर.एल.मोरे यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी २० हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

Shahu school principal sentenced to 20 thousand | शाहू विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला २० हजारांचा दंड

शाहू विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला २० हजारांचा दंड

बीड : पाच क्विंटल जादा तांदूळ साठा आढळल्याप्रकरणी येथील छत्रपती शाहू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर.एल.मोरे यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी २० हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.
येथील शाहूनगर भागातील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात पोषण आहार विभागाच्या अधिकाऱ्यांनी २४ नोव्हेंबर २०१६ रोजी अचानक तपासणी केली होती. यावेळी पाच क्विंटल ३६ किलो जादा तांदूळसाठा आढळला होता. याबाबत शिक्षण विभागाने मुख्याध्यापिका मोरे यांना खुलासा मागविला होता; पण त्यांचा खुलासा शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर यांनी अमान्य केला. ५ हजार ३६० विद्यार्थ्यांसाठी लागणारा पाच क्विंटल ३६ किलो जादा तांदळाचा हिशेब न देता आल्याने मुख्याध्यापिका मोरे यांना २० हजार ६८९ रुपये शासनखाती जमा करावेत, असे आदेश हिंगोणेकर यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Shahu school principal sentenced to 20 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.