गणेशोत्सवावर दुष्काळाची छाया

By Admin | Updated: August 24, 2014 01:15 IST2014-08-24T00:55:51+5:302014-08-24T01:15:31+5:30

नांदेड : अवघ्या काही दिवसावर आलेल्या गणेशोत्सवावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे़

Shadow of drought on Ganeshotsav | गणेशोत्सवावर दुष्काळाची छाया

गणेशोत्सवावर दुष्काळाची छाया

नांदेड : अवघ्या काही दिवसावर आलेल्या गणेशोत्सवावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे़ शहरातील गाडीपुऱ्यात बाप्पांच्या मुर्तीवर अखेरचा हात फिरवित मुर्तीकारांनीही त्याला दुजोरा दिला़
यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे विघ्नहर्त्याच्या मुर्तीलाही यंदा महागाईची झळ बसत आहे़ गुजरातहून येणाऱ्या शाडूच्या मातीपासून रंगांपर्यत मूर्ती बनविण्यासाठी आवश्यक सर्वच घटकांवर पावसाचा परिणाम यंदा दिसून आला़ त्यामुळे कारखान्यांमध्येच गणेशमुर्तीचे दर १५ ते २० टक्के वाढले असून किरकोळ बाजारपेठेत या मुर्त्या आणखी महागणार आहेत़
मुर्तीसाठी आवश्यक असलेली माती प्रामुख्याने गुजरातच्या भावनगर, सौराष्ट्र येथून येते़ यंदा मातीचे भाव वधारले आहेत़ शिवाय कारागिरांच्या यंदा कमतरता आहे़ त्यात उपलब्ध कारागिरांची मजूरी, रंग आणि अन्य साहित्यासह जागेचे भाडे यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़
मोठ्या सार्वजिनक गणेशमुर्तीसाठी प्रसिद्ध असलेले गजेंद्र ठाकूर म्हणतात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे गणेश मंडळामध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही़ बाजारपेठेतही पूर्वीसारखी रेलचेल नाही़ त्यात पूर्वी १० ते १२ फुटी गणेश मुर्तींची मागणी करणारी मंडळे यंदा शक्य तितक्या कमी उंचीच्या अन बजेटमधील मुर्त्यांची मागणी करीत आहेत़ जिल्ह्यात तयार करण्यात येणाऱ्या मुर्त्यांना शेजारील आंध्रप्रदेश, कर्नाटकातूनही मोठी मागणी आहे़ (प्रतिनिधी)
परराज्यातून मागणी
नांदेडातील बाप्पांच्या मुर्तींना निजामाबाद, हैद्राबाद, कामारेड्डी तसेच यवतमाळ, लातूर, परभणी, हिंगोली या ठिकाणाहून मुर्तींची मागणी होत आहे़ परंतु गतवर्षीपेक्षा यंदा मुर्तीची उंची आणि बजेटबाबत सर्वच मंडळे हात आखडता घेत आहेत़
कमी पर्जन्यमानाचा फटका
यंदा कमी पर्जन्यमानाचा फटका गणेश मुर्तींनाही बसला आहे़ यामुळे कारागिरांना बऱ्याच अडचणी सामारो जावे लागले़ गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी २० ते ३० टक्के कमी मुर्ती तयार करण्यात आल्या असल्याचे मुर्तीकार शंकरसिंग ठाकूर यांनी सांगितले आहे़

Web Title: Shadow of drought on Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.