शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रक्षा बंधनावर दुष्काळाची छाया

By admin | Updated: August 7, 2014 00:16 IST

हिंगोली : बहीण-भावाच्या प्रेमाची साक्ष देणाऱ्या रक्षाबंधनाचा सण प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; परंतु यंदा दुष्काळाची छाया जिल्ह्यावर असल्याने बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविली.

हिंगोली : बहीण-भावाच्या प्रेमाची साक्ष देणाऱ्या रक्षाबंधनाचा सण प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; परंतु यंदा दुष्काळाची छाया जिल्ह्यावर असल्याने बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. परिणामी दरवर्षी नागपंचमीपासून बाजारात दिसणारी गर्दी आणि लखलखाट पहावयास मिळत नाही. १० आॅगस्ट रोजी देशभर हा सण साजरा होईल. मराठवाड्यात लोक या सणापासून थोडे लांबच असल्याने हिंगोलीचे चित्र वेगळे नाही. जिल्ह्याची इकॉनामी शेतीवर अवलंबून असल्याने यंदा पिकांची अवस्था बिकट आहे. उशिरा पेरणी झाल्यामुळे उत्पादनात घट होईल. दरम्यान पावसातही अनियमितता व अनिश्चिता असल्याने अधिक खर्च करण्यासाठी शेतकरी हात आखडता घेत आहेत. परिणामी बाजाराच्या उलाढालीवर फटका बसल्याने व्यापाऱ्यांना हातावर हातावर हात धरून बसावे लागत आहे. प्रतिवर्षी नागपंचमीपासून राख्यांचे विविध ठिकाणी दुकाने लागलेले दिसतात. रस्त्यांवरील गाड्यांवरही राख्या विकणाऱ्यांची संख्या लक्षणिय असते. चार दिवसांवर सण आला असताना गतवर्षीचे चित्र दिसत नाही. राख्यांसाठी महिलांना दुकाने शोधावे लागतात. पीकपरिस्थिती पाहता व्यापाऱ्यांनी देखील राख्या विक्रीसाठी आणल्या नाहीत. अगदी मोजके दुकाने हिंगोलीत आढळतात. त्यावर व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसतात. दिवसभरात मोजता येतील एवढेच ग्राहक खरेदीसाठी येतात. काही व्यापाऱ्यांनी गुंतविलेले पैसे यंदा निघण्याची शक्यता कमी आहे. मागील ३१ वर्षांपासून पहिल्यांदा विपरित चित्र असल्याचे विक्रेता तरूण जयस्वाल यांनी सांगितले. आकर्षक राख्या बाजारातबाजार थंड असला तरी हिंगोलीत विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात राख्या विक्रीसाठी आणल्या आहेत. फॅन्सी, दोरी, जरी, रेशम प्रकारातील राख्यांची सध्या चलती आहे. किमान १ रूपयांपासून ४० रूपयांपर्यंत या राखीची किंमत आहेत. दुसरीकडे स्टोन राख्यांची किंमत अधिक असल्याने ५० ते १०० रूपयांपर्यंत ग्राहकांना पैसे मोजावे लागतात. चमकदार स्टोनमुळे या राख्यांची किमती वाढल्या आहेत. पूर्वी स्पंजच्या राख्यांनी हात भरून दिसत होता. दूरवरून या राख्या दृष्टीस पडत होत्या. पण या राख्या इहितास जमा होण्याचा मार्गावर आहेत. उलट जितक्या लहान असेल तितकी अधिक पसंती ग्राहकांची लाभते. विक्रेत्यांनी त्याचा विचार करून नाजूक, लहान आकाराच्या राख्या मागविल्या असल्याचे शेख जमीर यांनी सांगितले. प्रथमच गणपती, स्वास्तीक, ओम चिन्हाच्या राख्या बाजारात आल्या आहेत.