खाजगीकरणाविरूद्ध एसएफआयची निदर्शने
By Admin | Updated: June 29, 2014 00:36 IST2014-06-29T00:31:48+5:302014-06-29T00:36:20+5:30
बीड: राज्यामध्ये होऊ घातलेल्या दोन खाजगी विद्यापीठांच्या विरोधात स्टुडन्ट फेडरेशन आॅफ इंडिया या संघटनेने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

खाजगीकरणाविरूद्ध एसएफआयची निदर्शने
बीड: राज्यामध्ये होऊ घातलेल्या दोन खाजगी विद्यापीठांच्या विरोधात स्टुडन्ट फेडरेशन आॅफ इंडिया या संघटनेने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. खाजगी विद्यापीठे झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, अशी भीती आंदोलनकांनी व्यक्त केली.
छत्तीसगढ मधील खाजगी विद्यापीठे मोठ्या प्रमाणात उभारली होती. मात्र नंतर ती बंद करावी लागली. आता राज्यातील पुणे व मुंबई या मोठ्या शहरात दोन खाजगी विद्यापीठे होऊ घातली आहेत. खाजगी विद्यापीठांना मान्यता देण्याऐवजी शासकीय विद्यापीठे सक्षम करा, अशी मागणी आंदोलकांनी केली. खाजगी विद्यापीठे रद्द करा, विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकाराचे रक्षण करा, शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा, शासकीय विद्यापीठांना सक्षम करा, या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या आडवणुकीचा घाट
एसएफआयचे राज्याध्यक्ष मोहन जाधव यांनी खाजगी विद्यापीठ आणून शिक्षण महाग करण्याचा घाट शासनाने घातला असल्याचा आरोप केला. त्यामुळे खाजगी विद्यापीठांची मनमानी वाढणार असून ते विद्यार्थ्यांना लुटायला मोकळे होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. खाजगी विद्यापीठे तातडीने रद्द करावीत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी देवीदास जाधव, रोहिदास जाधव,विशाल गोरे, मीरा कांबळे, सुहास झोडगे, अमोल वाघमारे यांनीदेखील शिक्षणाच्या खाजगीकरणाविरूद्ध कडाडून टीका केली. त्यानंतर आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन सादर केले.