सातवीच्या विद्यार्थिनीचा अज्ञात तापाने मृत्यू

By Admin | Updated: October 19, 2014 00:42 IST2014-10-19T00:31:18+5:302014-10-19T00:42:14+5:30

वडोदबाजार : औरंगाबाद येथील भानुदासनगरातील ब्रिलियंट किडस् स्कूलच्या एका विद्यार्थिनीचा शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात तापाने मृत्यू झाला.

Seventh-year student unidentified fever death | सातवीच्या विद्यार्थिनीचा अज्ञात तापाने मृत्यू

सातवीच्या विद्यार्थिनीचा अज्ञात तापाने मृत्यू

वडोदबाजार : औरंगाबाद येथील भानुदासनगरातील ब्रिलियंट किडस् स्कूलच्या एका विद्यार्थिनीचा शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात तापाने मृत्यू झाला.
निकिता भाऊसाहेब चव्हाण (१३, रा. एन-२ राजीव गांधीनगर, मुकुंदवाडी) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता सातवीत शिक्षण घेत होती. गेल्या दोन दिवसांपासून ती अचानक आजारी पडून तापाने फणफणली होती. खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतली. मात्र शुक्रवारी रात्री अचानक तिची तब्येत खालावल्याने तिला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तिच्या आकस्मिक निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होता निकिताचा वाढदिवस
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निकिताचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने तिच्या कुटुंबियांनी सर्व ती तयारी व खरेदी केली होती. वाढदिवस साजरा करण्यासाठी ते लक्ष्मीपूजनाच्या दिवसाची वाट पाहत होते. मात्र काळाने अचानक तिच्यावर घाला घातला. शनिवारी सकाळी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Seventh-year student unidentified fever death