२७0 गावांतील सातबारा अद्ययावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:49 IST2017-09-16T23:49:58+5:302017-09-16T23:49:58+5:30
जिल्हाधिकाºयांनी संगणकीकृत सातबारांची बाब मनावर घेतल्याने हिंगोली जिल्ह्यातील तब्बल २७0 गावांतील सातबारा अद्ययावत झाल्या आहेत. जिल्ह्याला २00 गावांचे उद्दिष्ट असताना २७0 गावांत काम झाले आहे.

२७0 गावांतील सातबारा अद्ययावत
हिंगोली : जिल्हाधिकाºयांनी संगणकीकृत सातबारांची बाब मनावर घेतल्याने हिंगोली जिल्ह्यातील तब्बल २७0 गावांतील सातबारा अद्ययावत झाल्या आहेत. जिल्ह्याला २00 गावांचे उद्दिष्ट असताना २७0 गावांत काम झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३00 गावांतील सातबारा अद्ययावत करण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सर्व तहसीलदारांना कडक सूचना दिल्या होत्या. या प्रणालीत वारंवार होणाºया बदलामुळे तसेच पूर्वीच्या सातबारातील काही कॉलमच नसल्याने दुरुस्तीत अडचणी येत होत्या. त्यामुळे शासनाच्या या प्रक्रियेत री-एडिटपर्यंतचा प्रवास केला आहे. यात सातबारातील दुरुस्ती, होल्डिंगमधील क्षेत्रफळ कमी-जास्त आढळत असल्यास त्याची दुरुस्तीही करण्यात आली. ३१ आॅगस्टपर्यंत महाराष्ट्रात आॅनलाईन सातबाराची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य झाले नाही. मात्र निदान आता हिंगोली जिल्ह्यातील २७0 गावांतील सातबारा या आॅनलाईन झाल्याचे प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे.
हिंगोली जिल्ह्यात एकूण ६९७ महसुली गावे आहेत. यात खातेदुरुस्तीची कामे ४६७ गावांत पूर्ण झाली आहेत. तर री-एडिटद्वारे दुरुस्तीची कामे पूर्ण केलेल्या गावांची संख्या २८३ आहे. यातूनही सातबारा अंतिम झालेल्या गावांची संख्या २७0 पर्यंत पोहोचली आहे. तर ४२७ गावांतील कामे मात्र अजूनही पूर्ण होणे बाकी आहे. पूर्ण झालेल्या कामाची टक्केवारी ३८.७४ टक्के एवढी आहे.