गढीजवळ अवैध वाळूच्या ७ ट्रक जप्त

By Admin | Updated: April 10, 2017 23:59 IST2017-04-10T23:55:50+5:302017-04-10T23:59:14+5:30

गेवराई : सोमवारी पुन्हा एकदा महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. ७ ट्रक जप्त करून पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या.

Seven trucks of illegal sand are seized near the fort | गढीजवळ अवैध वाळूच्या ७ ट्रक जप्त

गढीजवळ अवैध वाळूच्या ७ ट्रक जप्त

गेवराई : वाळू माफियांनी नायब तहसीलदारांसह तलाठ्यांवर हल्ला केल्याच्या घटनेनंतर सोमवारी पुन्हा एकदा महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. ७ ट्रक जप्त करून पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या.
तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी गढीहून गेवराईच्या दिशेने निघालेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या सात ट्रक सोमवारी पहाटे पकडल्या. त्यामध्ये ४० ब्रास वाळू असून चालकांकडे वाळू उपसा व वाहतुकीचा परवाना आढळून आला नाही. एमएच २० डीई १५९८, एमएच २० डीई ७५५०, एमएच २० डीई ४४०१, एमएच २० डीके ४१७५, एमएच २० टी ९९०१, एमएच २० सीटी ३९०९, एमएच २० इजी ७७८ असे जप्त केलेल्या ट्रकचे क्रमांक आहेत. सातही ट्रक ताब्यात असून, याप्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाईची दिशा ठरविण्यात येईल, असे तहसीलदार आशिषकुमार बिरादार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Seven trucks of illegal sand are seized near the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.