सात हजार रुग्णांचे हाल
By Admin | Updated: March 24, 2017 00:33 IST2017-03-24T00:32:32+5:302017-03-24T00:33:33+5:30
जालना : धुळे येथील डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने गुरूवारी शहरातील १३७ दवाखान्यांतील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात आला.

सात हजार रुग्णांचे हाल
जालना : धुळे येथील डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने गुरूवारी शहरातील १३७ दवाखान्यांतील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात आला. त्यामुळे सात हजारांपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी होऊ शकली नाही. रात्री उशिरापर्यंत तपासणी झालीच नाही. मात्र गंभीर आजारी रुग्णांची तपासणीसह सर्व औषधोपचार सुरू होते.
धुळे एका डॉक्टरला बेदम मारहाण करण्यात आली होती. विविध डॉक्टर संघटनांनी या घटनेचा निषेध सुरू केलेला आहे. यात निषेधात इंडियक मेडिकल असोसिएशनने सहभाग नोंदवून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली. जालना शहरात हॅलोपॅथी, होमियोपॅथी, निमा मिळून १३७ दवाखान्यांची नोंद आहे.
सरासरी प्रती दवाखान्यात दररोज ५० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी होते. त्यामुळे दिवसभरात सात हजारपेक्षा अधिक रुग्णांना तपासणी पुढे ढकलावी लागली. शहरासह जिल्ह्यातील सर्वच खाजगी डॉक्टरांनी बाह्यरुग्ण तपासणी बंद ठेवल्याने हजारो रुग्णांचे हाल झाले. सोबतच शस्त्रक्रियाही रखडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान तालुकास्थानीही डॉक्टरांनी काम बंद ठेवून निषेध नोंदविला. (प्रतिनिधी)