साडेसहा हजार लिटर रॉकेल छापा मारून पकडले
By Admin | Updated: April 23, 2015 00:50 IST2015-04-23T00:31:58+5:302015-04-23T00:50:15+5:30
बीड : घरगुती वापराचे असलेले निळे रॉकेल अवैधरित्या साठवणूक करणाऱ्या तीन ठिकाणावर डीवायएसपी गणेश गावडे पाटील यांच्या पथकाने बुधवारी दुपारी छापे टाकून साडेसहा हजार लिटर रॉकेल जप्त केले आहे

साडेसहा हजार लिटर रॉकेल छापा मारून पकडले
बीड : घरगुती वापराचे असलेले निळे रॉकेल अवैधरित्या साठवणूक करणाऱ्या तीन ठिकाणावर डीवायएसपी गणेश गावडे पाटील यांच्या पथकाने बुधवारी दुपारी छापे टाकून साडेसहा हजार लिटर रॉकेल जप्त केले आहे. याची किंमत बाजारात ४ लाख रुपयांच्या आसपास असल्याचे समजते.
बीड शहरातील मोहम्मदीया कॉलनी परिसरात असणाऱ्या तीन ठिकाणी अवैधरित्या निळे रॉकेल ठेवले असल्याची माहिती डीवायएसपी गावडे यांना मिळाली. बुधवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक पठाण व इतर वीस ते पंचेवीस कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी धाड टाकली. धाड टाकल्यानंतर मोहम्मदीया कॉलनी परिसरामध्ये पहिल्या कारवाईत १९ मोठ्या टाक्या, ११ छोटे कॅन पोलीसांना मिळाले. त्यानंतर त्यांनी जवळपासच्या परिसरात छापा टाकला. तेथे ३६ लिटरचे ५६ कॅन मिळून आले. त्यानंतर तिसऱ्या कारवाईत ३५ लिटरचे ४७ कॅन जप्त करण्यात आले.
१९ मोठ्या टाक्यांसह ११० कॅन जप्त करण्यात आले होते. दुपारी झालेल्या कारवाईनंतर मोहम्मदीया कॉलनीत एकच खळबळ उडाली होती. सायंकाळी ८ वाजेपर्यंत कारवाईचे कामकाज सुरू होते. या प्रकरणी साठवण करणाऱ्या तिघाजणांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. (प्रतिनिधी)