आचारसंहितेच्या पालनावर नजर ठेवण्यासाठी सात पथके
By Admin | Updated: September 29, 2014 00:38 IST2014-09-29T00:14:16+5:302014-09-29T00:38:26+5:30
जालना : आदर्श आचारसंहितेचे पालन योग्यरित्या होण्यासाठी त्यावर नियंत्रण म्हणून जालना विधानसभा मतदारसंघात सात विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आचारसंहितेच्या पालनावर नजर ठेवण्यासाठी सात पथके
जालना : आदर्श आचारसंहितेचे पालन योग्यरित्या होण्यासाठी त्यावर नियंत्रण म्हणून जालना विधानसभा मतदारसंघात सात विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये चोवीस तास काम करणाऱ्या सात स्थिर पथकांचाही समावेश आहे. सदर पथकात एक दंडाधिकारी व एका पोलिस कर्मचाऱ्याचा सहभाग आहे. हे पथक तपासणी चौक्या उभारून त्यांच्या कार्यक्षेत्रात आणण्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील रोख रक्कमा, बेकायदेशीर दारू, कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा शस्त्रे यावर लक्ष ठेवून त्याचे व्हिडीओ चित्रण करणार आहे.
भरारी पथकामध्ये ग्रामीण व शहरी भागात २४ तास काम करण्याकरीता प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. बेकायदेशीर पैशाचे व्यवहार किंवा दारूचे कोणतेही वाटप किंवा मतदारांना लाच देण्यासाठी वापरल्या जाण्याचा संशय असलेल्या कोणत्याही अन्य बाबींचा शोध घेतला जाणार आहे. या पथकात कार्यकारी दंडाधिकारी, पोलिस अधिकारी, चार सशस्त्र पोलिस कर्मचारी व एक व्हिडीओग्राफरचा समावेश आहे. सहाय्यक खर्च निरीक्षक हे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात आहेत. (प्रतिनिधी)