सहा महिन्यांत सात शस्त्रक्रिया

By Admin | Updated: September 19, 2014 00:27 IST2014-09-19T00:26:44+5:302014-09-19T00:27:18+5:30

हिंगोली : दोन वर्षांपूर्वी शस्त्रक्रियेत शिर्ष स्थानावर पहोचलेल्या हिंगोली सामान्य रूग्णालयात मागील सहा महिन्यांत कुटुंबकल्याणच्या डझनभरही शस्त्रक्रिया झाल्या नाहीत.

Seven surgeries in six months | सहा महिन्यांत सात शस्त्रक्रिया

सहा महिन्यांत सात शस्त्रक्रिया

हिंगोली : दोन वर्षांपूर्वी शस्त्रक्रियेत शिर्ष स्थानावर पहोचलेल्या हिंगोली सामान्य रूग्णालयात मागील सहा महिन्यांत कुटुंबकल्याणच्या डझनभरही शस्त्रक्रिया झाल्या नाहीत. एप्रिल आणि मे महिन्यात शस्त्रक्रिया विभागाला कुलूप होते. जून, जुलैत आटापिटा करून शस्त्रक्रियांची सुरूवात केली तर डॉक्टर नव्हते. आता सप्टेंबर अर्धा लोटला तरी एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. शिवाय नवीन डॉक्टरांची नेमणूक करण्यातही उदासीनता दिसते. उलट सरळ खाजगी रुग्णालयाकडे बोट दाखविले जात असल्याने अर्ध्या वर्षात मोजून ७ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
कुटुंबकल्याण आरोग्य विभागाच्या अजेंड्यावरील तसा महत्त्वाचा विषय. गरोदर महिलांना रूग्णालयात आणण्यापासून ते प्रसुतीनंतर सुखरुप घरी नेऊन सोडण्यासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. एका कॉलवर अतिदुर्गम भागातही तातडीने रूग्णावाहिका पोहोचते. रूग्णालयात बाल व मातेच्या संगोपनापासून आहाराचीही व्यवस्था केली जाते. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला.
कोट्यवधींचे साहित्य, साधने धूळ खात पडली आहेत. तरीही अधिकाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. नव्या वित्तीय वर्षाच्या प्रारंभापासून शस्त्रक्रियाच झाल्या नाहीत. केवळ ८ शस्त्रक्रियांची नोंद रूग्णालयात सापडते. सुरूवातीचे दोन महिने तर शस्त्रक्रिया कक्ष बंदच होता. विनवण्या करून तो सुरू केला तर आता डॉक्टरच नाहीत. एकानंतर एक महिने जाऊन अर्धे वर्ष संपले. चालू महिन्यात एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Seven surgeries in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.