सात दुकाने फोडली

By Admin | Updated: August 27, 2014 00:16 IST2014-08-27T00:11:34+5:302014-08-27T00:16:02+5:30

औरंगाबाद : देवळाई चौकातील डिलक्स कॉम्प्लेक्समध्ये काल मध्यरात्री चोरट्यांनी पुन्हा एकदा चांगलाच धुमाकूळ घातला.

Seven shops broke down | सात दुकाने फोडली

सात दुकाने फोडली

औरंगाबाद : देवळाई चौकातील डिलक्स कॉम्प्लेक्समध्ये काल मध्यरात्री चोरट्यांनी पुन्हा एकदा चांगलाच धुमाकूळ घातला. या कॉम्प्लेक्समधील सलग सात दुकाने फोडून साडेतीन लाखांचा ऐवज पळविला. विशेष म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीही याच कॉम्प्लेक्समधील एक कार्यालय फोडून सव्वा लाख रुपये रोख रक्कम पळविली होती. या घटनेने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड बायपास रोडवर देवळाई चौकातच डिलक्स कॉम्प्लेक्स या व्यापारी संकुलात बरेच आॅफिस आणि दुकाने आहेत. काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नित्याप्रमाणे येथील व्यापारी आपापली दुकाने बंद करून निघून गेली.
मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी येथील आयकॉन बिल्डर्स यांचे कार्यालय फोडले. तेथे चोरट्यांना काही रोख रक्कम सापडली नाही. त्यानंतर बाजूलाच असलेले मेट्रो इलेक्ट्रिकल्स दुकान फोडले.
याच ठिकाणी सतत घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच व्यापाऱ्यांनी संतापही व्यक्त केला. या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

Web Title: Seven shops broke down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.