सव्वातीन लाखांचे बियाणे लंपास

By Admin | Updated: June 19, 2014 00:17 IST2014-06-18T23:49:04+5:302014-06-19T00:17:38+5:30

वालूर: सेलू तालुक्यातील वालूर येथील झीरोफाटा रस्त्यावरील एका कृषी दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख ३८ हजार ५२० रुपयांचे कपाशीचे बियाणे लंपास केल्याची घटना १८ जून रोजी पहाटे घडली.

Seven lakhs seed lumpas | सव्वातीन लाखांचे बियाणे लंपास

सव्वातीन लाखांचे बियाणे लंपास

वालूर: सेलू तालुक्यातील वालूर येथील झीरोफाटा रस्त्यावरील एका कृषी दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख ३८ हजार ५२० रुपयांचे कपाशीचे बियाणे लंपास केल्याची घटना १८ जून रोजी पहाटे घडली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील झीरोफाटा रस्त्यावर मदिना कृषी केंद्र आहे. या दुकानाचे मालक मोहम्मद बिलाल मोहम्मद हनीफ कुरेशी हे मंगळवारी रात्री नित्यनियमाने आपले दुकान बंद करुन घरी गेले. बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी कृषी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाशीचे राशी, अजित, मारगो आदी कंपनीचे बियाणे चोरट्यांनी लंपास केले. तसेच पांडुरंग भाऊसाहेब आंधळे यांचे अजित व प्रतीक कंपनीचे ३६ हजार २७० रुपयांचे बियाणे कृषी दुकानात ठेवले होते. तेदेखील चोरट्यांनी लंपास केले. तसेच मोहम्मद बिलाल यांचे ३ लाख २ हजार २५० रुपये व पांडुरंग आंधळे यांचे ३६ हजार २७० असे एकूण ३ लाख ३८ हजार ५२० रुपयांचे कपाशी बियाणे लंपास केले. याप्रकरणी मोहम्मद बिलाल व पांडुरंग आंधळे यांच्या फिर्यादीवरुन सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक रोडे, पोनि.बिभडे यांनी घटनास्थळी जावून भेट देऊन पंचनामा केला. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.(वार्ताहर)
पोलिसांसमोर आव्हान
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे ८ दिवसांपूर्वी कृषी दुकान चोरट्यांनी फोडून हजारो रुपयांचा कपाशी बियाणे लंपास केले होते. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अद्यापही पकडले नाही. त्यानंतर ही दुसरी घटना घडली.जिल्ह्यात चोरीच्या घटनेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पोलिस मात्र जुगार व दारुच्या अड्यावर धाड मारण्यात धन्यता मानत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Seven lakhs seed lumpas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.