सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली बाचाबाची, मारहाण

By Admin | Updated: May 30, 2014 01:00 IST2014-05-30T00:38:04+5:302014-05-30T01:00:46+5:30

औरंगाबाद : गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ दोन कारचालकांमध्ये आधी बाचाबाची, शिवीगाळ व मारहाण झाली

Seven Hills under the flyover, beat | सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली बाचाबाची, मारहाण

सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली बाचाबाची, मारहाण

औरंगाबाद : गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ दोन कारचालकांमध्ये आधी बाचाबाची, शिवीगाळ व मारहाण झाली. यात एका महिलेचा हात पिरगळून तिला झापड मारल्यामुळे व जातिवाचक उद्गार काढण्यात आले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात कोमल अभय गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी व माझे पती मुलांसह कार क्रमांक एमएच-२० - २०८८ मध्ये बसून शिवाजीनगर येथून माझे वडील राजू खरे यांच्या घरी एन-९ हडकोकडे येत होतो. सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ इंडिका कार क्रमांक एमएच-२० एबी ३८८५ च्या चालकाने भरधाव वेगाने आम्हाला ओव्हरटेक केले. आमच्या कारला धक्का लागता लागता वाचला. माझ्या पतीने कार, इंडिका कारच्या पुढे घेऊन जात असताना इंडिका कारमधील तिघांनी माझ्या पतीस कार बाजूला घ्यायला सांगितले. माझ्या पतीने त्या तिघांच्या कारची चावी काढून घेतली व आम्ही मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठले. नंतर सिडको पोलीस ठाण्यात गेलो. तेथे हे तीन इसम तेथे दिसले. माझे वडील राजू खरे यांना ही हकीकत सांगितली. ते सिडको पोलीस ठाण्यात गेले असता तेथे त्या तीन इसमांना सोडून देण्यात आले असल्याचे कळले. या प्रकरणी स्वत: राजू खरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, एका महिलेचा हात धरून मारहाण केली जाते तरी पोलीस आरोपींवर काहीच कारवाई न करता सोडून देतात, हे कसे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी सांगितले की, आलेल्या तक्रारीनुसार तपास करीत आहोत. आम्ही आमची कार बाजूला थांबविली. इंडिका कारमधील तिघे जण खाली उतरले व त्यांनी माझ्या पतीस शिवीगाळ करण्यास सांगितले. आमच्या गाडीत भीमगीत चालू होते. ते ऐकून त्यांनी जातिवाचक उद्गार काढले. मी माझ्या मोबाईलमध्ये हा सारा प्रकार शूटिंग करीत होते. त्यातील एका इसमाने ‘तू शूटिंग करते का’ असे म्हणून माझा हात पिरगळून मला चापट मारली. त्यानंतर माझे पती व त्या तिघांची बाचाबाची झाली. त्यांनी माझ्या पतीस मारहाण केली व जातिवाचक शिवीगाळ केली.

Web Title: Seven Hills under the flyover, beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.