बाळापूरमध्ये बिबट्याने पाडला गोठ्यातील सात शेळ्यांचा फडशा
By Admin | Updated: August 31, 2014 00:41 IST2014-08-31T00:34:45+5:302014-08-31T00:41:38+5:30
सराटी : सिल्लोड तालुक्यातील बाळापूर गावात बिबट्याने मध्यरात्री सात शेळ्यांचा फडशा पाडला.

बाळापूरमध्ये बिबट्याने पाडला गोठ्यातील सात शेळ्यांचा फडशा
सराटी : सिल्लोड तालुक्यातील बाळापूर गावात बिबट्याने मध्यरात्री सात शेळ्यांचा फडशा पाडला. गावातील वेगवेगळ्या तीन शेतकऱ्यांच्या गोठ्यातील शेळ्या बिबट्याने फस्त केल्या. गोठ्याच्या सभोवताली बिबट्याच्या पायांचे ठसे पाहायला मिळाले.
बाळापूर गावाजवळील गोठ्यांमध्ये घुसून बिबट्याने सात शेळ्या फस्त केल्याने घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. गावातील गोठ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाळापूर येथील सरपंच अशोक नामदेव सूर्यवंशी यांच्या गोठ्यातील दोन शेळ्या, सुग्राबाई ईसा तडवी यांच्या चार शेळ्या, संतोष सांडू निंभोरे यांची एक शेळी अशा तीन शेतकऱ्यांच्या सात शेळ्या बिबट्याने फस्त केल्या.
वन विभागाचे मिश्रीलाल माहोर, शेख फकिरा, वाघ, (वनमजूर), अशोक सूर्यवंशी, गणेश चव्हाण, फुलसिंग चव्हाण, रतनसिंग सूर्यवंशी, देवीदास सैवार उपस्थित होते. सदरील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)