माध्यमिक शिक्षकांच्या पंचेचाळीस जागा रिक्त

By Admin | Updated: July 20, 2014 00:25 IST2014-07-19T23:45:45+5:302014-07-20T00:25:41+5:30

हिंगोली : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांच्या गणित, विज्ञान, उर्दू माध्यमाच्या जवळपास ४५ जागा रिक्त आहेत. त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.

Seven forty-five seats of secondary teachers are empty | माध्यमिक शिक्षकांच्या पंचेचाळीस जागा रिक्त

माध्यमिक शिक्षकांच्या पंचेचाळीस जागा रिक्त

हिंगोली : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांच्या गणित, विज्ञान, उर्दू माध्यमाच्या जवळपास ४५ जागा रिक्त आहेत. त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.
जिल्हा परिषद माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल चालू वर्षी समाधानकारक लागला असला तरी या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या तुलनेत सरळ सेवा भरतीने नवीन पदांची भरती केली जात नसल्याने विद्यार्थ्यांसमोरील संकट वाढले आहे. गतवर्षी जिल्ह्यात गणित विषयाचा एकुण १२ जागा रिक्त होत्या. त्यामध्ये आठ जागा कळमनुरी तालुक्यातील तर ४ जागा सेनगाव तालुक्यातील होत्या. त्यानंतर विज्ञान विषयाच्या गतवर्षी २३ जागा रिक्त होत्या. त्यामध्ये औंढा तालुक्यात ४, कळमनुरी तालुक्यात ७, हिंगोली तालुक्यात २, सेनगाव तालुक्यात १० जागा रिक्त होत्या. उर्दू गणित विषयाच्या हिंगोली व वसमत येथे प्रत्येकी १ अशा २ तर उर्दू व विज्ञानची वसमत येथे १ जागा रिक्त होती. या जागा रिक्त असतानाही ३० जून २०१३ ते ३० जून २०१४ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या ७ शिक्षकांना परजिल्ह्यात बदलीवर जाण्यास परवानगी देण्यात आली. ही परवानगी देताना काहींनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार न करता उखळ पांढरे करून घेतले. परिणामी जि. प. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या रिक्त जागा भरण्याची व जागा रिक्त असतानाही परजिल्ह्यात जाणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
मागील वर्षीपासून समस्या
रिक्त जागा असतानाही ३० जून २०१३ ते ३० जून २०१४ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या ७ शिक्षकांना परजिल्ह्यात बदलीवर.
गतवर्षी जिल्ह्यात गणित विषयाचा एकूण १२ जागा रिक्त होत्या.

Web Title: Seven forty-five seats of secondary teachers are empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.