जायकवाडीत सात दलघमीची आवक

By Admin | Updated: July 6, 2016 23:58 IST2016-07-06T23:51:38+5:302016-07-06T23:58:03+5:30

औरंगाबाद : धरण क्षेत्रातील पावसामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे.

Seven Dalgrami arrivals in Jaikwadi | जायकवाडीत सात दलघमीची आवक

जायकवाडीत सात दलघमीची आवक

औरंगाबाद : धरण क्षेत्रातील पावसामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत धरणात ७ दलघमी पाणी आल्याची माहिती औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा)चे सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी दिली.
जायकवाडी धरणातील जिवंत साठा मार्च महिन्यातच संपला आहे. तेव्हापासून औरंगाबाद, जालनासह विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना आणि औद्योगिक वसाहतींच्या वापरासाठी या धरणाच्या मृतसाठ्यातूनच पाणी उपसा सुरू आहे. धरणाच्या मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी इतकी आहे. मंगळवारपर्यंत त्यातील २६५ दलघमी इतका पाणी उपसा झालेला होता. परंतु मंगळवारी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. परिणामी धरणात कालच पाण्याची आवक सुरू झाली. मंगळवारी सकाळपर्यंत धरणात ७ दलघमी पाणी आले. त्यामुळे मृतसाठ्यातील पाणीपातळी ५४० दलघमी वर आली आहे. धरणातील पाणी पातळी जिवंत साठ्यात येण्यासाठी अजूनही २५८ दलघमी पाण्याची गरज आहे. त्यानंतरच जिवंत साठ्यात पाणी साठण्यास सुरुवात होईल. त्यासाठी अजून मोठ्या पावसाची गरज आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी झाले असल्याचेही कडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Seven Dalgrami arrivals in Jaikwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.