चोरीचे सात मोबाईल जप्त

By Admin | Updated: February 4, 2017 00:44 IST2017-02-04T00:42:14+5:302017-02-04T00:44:36+5:30

तुळजापूर :सहाय्यक पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्या पथकाने गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास कारसह चोरीचे सात मोबाईल जप्त केले़

Seven cell phones of theft seized | चोरीचे सात मोबाईल जप्त

चोरीचे सात मोबाईल जप्त

तुळजापूर : तुळजापूर- उस्मानाबाद राष्ट्रीय महामार्गावरील बोरी गावाजवळील पेट्रोलपंपासमोर सहाय्यक पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्या पथकाने गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास कारसह चोरीचे सात मोबाईल जप्त केले़ कारमधील पती-पत्नींनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सहाय्यक पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पोहेकॉ लक्ष्मीकांत भोळे, लक्ष्मीकांत माने, चालक महेमूदखान पठाण, पोहेकॉ सय्यद हे गुरूवारी रात्री गस्तीवर होते़ तुळजापूर तालुक्यातील बोरी गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपासमोर एक कार या पथकाला संशयितरीत्या आढळून आली़ कारची तपास करीत असताना गाडीमध्ये एक पुरुष, एक महिला व लहान मुलगा आढळून आला. त्यांच्याकडे चोरीचे विविध कंपन्यांचे ७ मोबाईल आढळून आले आहेत. कारही चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे़ कारसह मोबाईलही ताब्यात घेण्यात आले असून, दाम्पत्याविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)

Web Title: Seven cell phones of theft seized