जिल्हा बँकेच्या धावडा शाखेत पैशाचा ठणठणाट
By Admin | Updated: April 20, 2015 00:28 IST2015-04-20T00:11:26+5:302015-04-20T00:28:52+5:30
फैजुल्ला पठाण ,धावडा भोकरदन तालुक्यातील धावडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत मागील आठ दिवसापासून ठणठणाट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अनुदानासाठी फरपट होत आहे

जिल्हा बँकेच्या धावडा शाखेत पैशाचा ठणठणाट
फैजुल्ला पठाण ,धावडा
भोकरदन तालुक्यातील धावडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत मागील आठ दिवसापासून ठणठणाट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अनुदानासाठी फरपट होत आहे. सामान्य ग्राहकही त्रस्त झाले आहे.
येथील शाखे अंतर्गत जाईचा देव, वाढोणा, विझोरा, मेहगाव वडोद तांगडा, वालसावंगी, धावडा आदी गावे आहेत. या गावातील ४१०० शेतकऱ्यांसाठी १ कोटी ७५ लाखाचा दुष्काळी अनुदानाचा निधी बँकला मिळालेला आहे. त्यातील काही गावातील शेतकऱ्यांना निधी वाटप केला. तर मेहगाव, वडोदतांगडा, वालसांवगी, व धावडा चार गावातील शेतकऱ्यांना वाटप करणे सुरू आहे. मात्र शाखेत नेहमीच पैशाचा ठणठणाट सुरू झाला आहे. त्यामुळे अनुदान वाटपासाठी कॅश कमी पडत आहे. कॅश आनन्यासाठी कर्मचाऱ्यांना भोकरदन येथील शाखेत जावे लागते. तेथून कॅश आल्यानंतर वाटपाच्यावेळी बँकेत मोठी गर्दी होते. धावडा शाखेला ३ लाखाच्यावर कॅश मिळत नाही. दुष्काळी अनुदानाची रक्कम व रोजची ग्राहकांच्या व्यवहारासाठीी या शाखेला दहा लाख रूपयाची आवश्यकता आहे. बँकेत कॅश नसल्याने शेतकऱ्यांना दररोज बँकेत चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे शेतकरी व ग्राहक त्रस्त्र झाले आहे.