शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

बायपासला सर्व्हिस रोड हाच पर्याय; सातारा-देवळाईच्या नागरिकांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 18:48 IST

अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासन उपाययोजना राबवीत आहे; पण अरुंद रस्ता व त्यावर वाहनांच्या प्रचंड गर्दीने नियोजन विस्कटते.

 औरंगाबाद : अपघात टाळण्यासाठी बीड बायपासला सर्व्हिस रोड झालाच पाहिजे, वेळकाढू धोरणामुळे मनपा, तसेच जागतिक रस्ते विकास महामंडळावर गुन्हे दाखल करावेत. अपघातातील मृताच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत करून एकाला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी सातारा-देवळाईतील नागरिकांनी बुधवारी बायपासवरील अपघातासंदर्भात आयोजित बैठकीत केली. 

अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासन उपाययोजना राबवीत आहे; पण अरुंद रस्ता व त्यावर वाहनांच्या प्रचंड गर्दीने नियोजन विस्कटते. त्यामुळे बीड बायपासची परिस्थिती किचकट झाली आहे. दर आठवड्याला एकाचा जीव जात आहे. हे अपघातसत्र थांबविण्यासाठी वाहतूक विभागाने जडवाहनांसाठी सकाळी व सायंकाळी केलेल्या प्रायोगिक प्रवेशबंदीत थोडा बदल करून वाहने सिंगल लाईनमध्ये कशी चालतील याकडे बघावे, अशी मागणीही नागरिकांनी केली. 

विरुद्ध दिशेने जाणाऱ्याला सोडून दिले जातेअपघाताची कारणे शोधण्यासाठी पोलीस नवनवीन प्रयोग करीत आहेत. बुधवारी कोहिनूर हॉल येथे आयोजित बैठकीत सर्वसामान्य नागरिक आले; पण ट्रक, रिक्षा व अवजड वाहनचालक आलेच नाहीत. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही. सिग्नलवरून दुचाकीस्वार पोलिसांसमक्ष गाडी सुसाट पळवितो, तेव्हा पोलीस बघ्याची भूमिका घेताना दिसतात. हे का, होते असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. त्याचे अनुकरण दुसरी व्यक्ती करते अन् अपघातास कारणीभूत ठरते. त्याकडे  पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे, असा मुद्दाही नागरिकांनी मांडला.

रस्त्यांवरील पार्किंगचे कायमंगल कार्यालयासमोरील पार्किंगमुळे वाहतूक जाम होते. त्यामुळेदेखील अपघात होत आहेत. आवश्यक ठिकाणी दुभाजक मोकळे करावेत, वळणाची जागा वाढवावी, जेणेकरून वाहन वळविणे सोयीचे ठरेल,  त्याकडेदेखील पोलिसांनी लक्ष द्यावे, अशा सूचनाही मांडल्या. वाहतुकीसंदर्भातील प्रश्नाचे निराकरण त्वरित केले जाईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक भारत काकडे, प्रेमसागर चंद्रमोरे आदींची उपस्थिती होती. 

यांनी मांडली मते...शकील पटेल, गुलाब पटेल, पंकजा माने, पुष्पा जगताप, इमरान पटेल, बद्रीनाथ थोरात, सुनील ठाकरे, सोमीनाथ शिराणे, हकीम पटेल यांच्यासह अन्य नागरिकांनी बैठकीत मते मांडली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका