जिल्हा परिषदेच्या शाळेत निघाला साप
By Admin | Updated: August 15, 2014 01:37 IST2014-08-15T01:31:22+5:302014-08-15T01:37:15+5:30
येणेगूर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरूवारी सकाळी अचानक साप निघाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांची मोठी धांदल उडाली होती़ शाळेला घाणीचा

जिल्हा परिषदेच्या शाळेत निघाला साप
येणेगूर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरूवारी सकाळी अचानक साप निघाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांची मोठी धांदल उडाली होती़ शाळेला घाणीचा विळखा पडल्याने व शाळेच्या अनेक खोल्यांना भेगा पडल्याने विद्यार्थ्यांच्या मनात मात्र, मोठी भिती निर्माण झाली आहे़
येथील जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेसाठी ११ वर्ग खोल्या असून, ७५ मुले, ८८ मुली असे जवळपास १६३ विद्यार्थी शिक्षणासाठी येतात़ विद्यार्थी गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत आले होते़ मात्र, शाळा भरण्यापूर्वीच वऱ्हंड्यात भला मोठा साप निघाला़ साप निघाल्याचे समजताच विद्यार्थी सैरावैरा धावू लागले़
मुख्याध्यापक प्रकाश पोळे, सहशिक्षक उत्तम कांबळे, तुकाराम परसेवाड, प्रकाश व्हनाळे यांनी धाव घेवून वर्गखोलीतील फरशीखाली लपलेल्या सापास ठेचून काढले़ त्यानंतर विद्यार्थ्यांनी काही काळ मोकळा श्वास घेतला़ मात्र, या शाळेच्या आवारात झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून, अनेक वर्गखोल्यांना भेगाही पडल्या आहेत़ त्यामुळे खोल्याही धोकादायक बनल्या आहेत. परिसरातील नागरिकच येथे प्रात:विधी करीत असल्याने दुर्गंधी पसरली आहे़ परिसर स्वच्छतेकडे मात्र, व्यवस्थापन समितीसह सर्वांचेच दुर्लक्ष दिसत आहे़ (वार्ताहर)