विनोदाच्या माध्यमातून उलगडले गांभीर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:29 IST2017-09-25T00:29:03+5:302017-09-25T00:29:03+5:30
डॉक्टरी व्यवसायातील भेडसावणाºया विविध प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारी ‘डॉक्टर मुलगा नको गं बाई’ ही एकांकिका रविवारी सायंकाळी ‘रंगकर्मी’ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सादर करण्यात आली.

विनोदाच्या माध्यमातून उलगडले गांभीर्य
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉक्टरकी हा पेशाच असा आहे की त्याभोवती कायम एक आकर्षणाचे वलय असते; मात्र ‘जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे...’ या उक्तीनुसार जेव्हा आपण स्वत: किं वा आपल्या अगदी जवळची एखादी व्यक्ती या पेशात जाते तेव्हाच या व्यवसायाची वास्तविकता समजते आणि आकर्षणाचे एकेक वर्तुळ गळून पडू लागते. डॉक्टरी व्यवसायातील भेडसावणाºया विविध प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारी ‘डॉक्टर मुलगा नको गं बाई’ ही एकांकिका रविवारी सायंकाळी ‘रंगकर्मी’ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सादर करण्यात आली. यामध्ये विनोदाच्या माध्यमातून वैद्यकीय पेशातील अनेक समस्या उलगडून दाखविण्यात आल्या.
डॉ. अनंत कडेठाणकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटिकेने डॉक्टरांना खळखळून तर हसविले; मात्र त्याचबरोबर या व्यवसायाला आलेल्या गंभीरतेची जाणीवही नकळतपणे करून देऊन उपस्थितांना विचारमग्न केले. डॉ. अमोल देशमुख, डॉ. मंजिरी देशमुख, डॉ. वैशाली लोखंडे-उणे, डॉ. रमेश रोहिवाल, डॉ. संदीप मुळे, डॉ. आनंद देशमुख, डॉ. अनंत कुलकर्णी, डॉ. विक्रम लोखंडे आणि डॉ. कडेठाणकर यांच्या अभिनयाने रंगलेल्या या नाटिकेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. एकांकिकेला डॉ. विशाल चौधरी यांचे संगीत मिळाले. रवी कुलकर्णी यांनी नेपथ्य व वेशभूषेची जबाबदारी सांभाळली. डॉ. उज्ज्वला दहीफळे यांनी संचालन केले.