गंभीर भाजलेल्या माय-लेकाचा मृत्यू

By Admin | Updated: May 31, 2014 01:25 IST2014-05-31T01:14:55+5:302014-05-31T01:25:02+5:30

वाळूज महानगर : वाळूज महानगरात काल गंभीररीत्या भाजलेल्या दोघा माय-लेकाचा उपचारादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

Seriously Burned Myelka's Death | गंभीर भाजलेल्या माय-लेकाचा मृत्यू

गंभीर भाजलेल्या माय-लेकाचा मृत्यू

वाळूज महानगर : वाळूज महानगरात काल गंभीररीत्या भाजलेल्या दोघा माय-लेकाचा उपचारादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, वंदना विलास कुलकर्णी (५५, रा. सिडको वाळूज महानगर) यांनी काल २९ मे रोजी मोठ्या प्रमाणात मुंग्या झाल्यामुळे त्यांना पळवून लावण्यासाठी घरात रॉकेल टाकले होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास वंदना कुलकर्णी या देवपूजा करण्यासाठी घरात गेल्या होत्या. पूजा करण्यासाठी त्यांनी दिवा लावून पेटती काडी घरात खाली फेकली असता आगीचा भडका उडून वंदना कुलकर्णी यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर या दोघांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळगावी पाठविण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेबद्दल सिडको वाळूज महानगरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक फौजदार सागरसिंग राजपूत करीत आहेत.वंदना कुलकर्णी यांनी मदतीसाठी आरडा-ओरड केल्यामुळे दुसर्‍या रूममध्ये असलेला त्यांचा मुलगा सुहास कुलकर्णी आईच्या मदतीला धावला. घरात पसरलेल्या रॉकेलमुळे आग मोठ्या प्रमाणात भडकून आई व मुलगा हे दोघेही गंभीर भाजले होते. १०० टक्के भाजलेल्या वंदना कुलकर्णी व सुहास कुलकर्णी यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री १२.३० वाजेच्या सुमारास सुहास कुलकर्णी, तर मध्यरात्रीनंतर २.३० वाजेच्या सुमारास वंदना कुलकर्णी यांचा मृत्यू झाला.

Web Title: Seriously Burned Myelka's Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.