घरफोड्यांची मालिका सुरूच
By Admin | Updated: September 29, 2014 00:41 IST2014-09-29T00:27:14+5:302014-09-29T00:41:24+5:30
रमेश शिंदे , औसा शहरात मागील महिनाभरापासून भरदुपारी चोऱ्याचे सत्र सुरु आहे़ आतापर्यन्त भरदुपारी घरफोड्याचे चार गुन्हे दाखल आहेत़ पण एकाही घरफोडीचा तपास पोलिसांना लावता आला नाही़

घरफोड्यांची मालिका सुरूच
रमेश शिंदे , औसा
शहरात मागील महिनाभरापासून भरदुपारी चोऱ्याचे सत्र सुरु आहे़ आतापर्यन्त भरदुपारी घरफोड्याचे चार गुन्हे दाखल आहेत़ पण एकाही घरफोडीचा तपास पोलिसांना लावता आला नाही़ त्यातच शुक्रवारी शहरातील गणेश नगर या भागात आसलेल्या बालाजी लिंबाळकर या शिक्षकाचे घर फोडून ५५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला़
मागील काही महिन्यापासून औसा तालुक्यात चोऱ्याचे सत्र सुरु आहे़ ठराविक दिवसाच्या अंतराने भरदुपारी शहरात घरफोड्या करुन चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे़ पोलिस मात्र अद्याप एक ही घरफोडीचा तपास लावण्यात यशस्वी झाले नाहीत़ पोलिसाकडून चोऱ्यांचा तपासच होत नसल्यामुळे चोरी झाली तरी ही अनेक जण पोलिसात तक्रार ही करण्याचे टाळत आहेत़
शहरातील बस आगराशेजारच्या गणेश नगर भागात बालाजी मनोहर सोनटक्के या शिक्षकांचे घर आहे़ बसस्थानक ते अॅप्रोच रोड हा भाग नेहमी गजबजलेला असतो़ तरी ही भरदिवसा या भागात चोरी करण्याचे धाडस चोरटे करीत आहेत़ बालाजी लिंबाळकर व त्यांच्या पत्नी हे दोघेही शिक्षक आहेत़ शुक्रवारी ते शाळेत गेले होते़ तर त्यांची मुलेही शाळेत गेली होती़ दुपारी १२ ते २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप व कडी कोंडा उचकढून काढला व घरात प्रवेश केला़ घरातील कपाट फोडून कपाटातील रोख २० हजार रुपये १ तोळा वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या व २५ ते ३० तोळा चांदीच्या विविध वस्तू असा ऐवज लंपास केला़ तर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकुन दिले आणि चोरटे पसार झाले़ पोलिसांनी येऊन पाहणी केली व गुन्हा नोंदवला़ विशेष म्हणजे यापूर्वी व्यापारी गौरीशंकर मिटकरी मुख्याध्यापक अनिल मुळे, यांच्या सह अन्य काही चोऱ्याही भरदुपारी आणि दरवाज्याचे कडीकोंडे उचकटून अशाच पद्धतीने झाल्या होत्या़ पंधरा दिवसानंतर पुन्हा त्याच पद्धतीने भरदिवसा घरफोडी झाली़ त्यामुळे पोलिसांना चोरट्यांनी आव्हानच दिले आहे़ पोलिसांकडे विचारणाा केली की तपास चालू आहे हे उत्तर ठरलेले असते़ त्यामुळे आता चोरी ही झाली तर नको ती पोलिसांची झंझट म्हणून तक्रार देण्याचे टाळले जात आहे़
संदीप अंकलकोटे ल्ल चाकूर
शहरात दिवसाढवळ्या घरफोड्याच्या घटना वाढल्या घडल्या़ एकही चोरी उघडकीस आणण्यास चाकूर पोलिसांना यश आले नसल्याने पोलिसांची निष्क्रियता रस्त्यावर आली आहे़ याशिवाय अवैध दारू विक्री, चंदनाची तस्करी, अवैध प्रवासी वाहतूक, गुटखा विक्री, छेडछाड अशा घटनांत वाढ झाली आहे़ तालुक्यात खुलेआम चालणारा मटका नावाच्या जुगारावर मात्र पोलिस अधीक्षकांच्या आदेशामुळे पोलिसांना कारवाई करावी लागत असल्याने काही प्रमाणात मटक्यास चाप बसला आहे़
चाकूर शहरातील आदर्श कॉलनीमधील प्रा़ रामचंद्र शेटकर यांच्या घराचे दिवसाढवळ्या कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लाखांचे दागिने चोरून नेले़ या घटनेला महिना उलटत आहे़ परंतु, अद्यापही तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही़ तसेच अॅड़ संतोष गंभीरे यांच्याही घरी दिवसा चोरी झाली़ त्यात २५ ते ३० हजारांचा ऐवज चोरीस गेला़ यापूर्वी शिक्षक चंद्रशेखर मिरजकर यांच्याही घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम चोरीस गेली होती़ चोरट्यांनी घरातील काही साहित्य बांधले होते़ परंतु, माणसांचा सुगावा लागल्याने ते साहित्य तेथेच ठेवून चोरटे पसार झाले़ स्विट होमचे व्यापारी हिरण शशिकांत कारवाडिया यांच्याही घरी दिवसा चोरी झाली होती़ परंतु, एकाही चोरीचा शोध चाकूर पोलिसांना लागत नसल्याने पोलिसांची निष्क्रियता रस्त्यावर आली आहे़ प्रा़ शेटकार यांनी या ६ लाख रूपये चोरीचा तपास लागत नसल्याने थेट पोलिसा अधीक्षकांकडे धाव घेतली आहे़ १९ सप्टेंबर रोजी कबनसांगवी येथील धनाजी बालाजी सांगवे यांच्या घरी झालेल्या चोरीत ९५ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास झाला़