मृतदेह आढळल्याने खळबळ
By Admin | Updated: April 22, 2016 00:28 IST2016-04-22T00:13:10+5:302016-04-22T00:28:56+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील शिंगोली शिवारातील रेल्वे पटरीच्या परिसरात असलेल्या शेतात एका अनोळखी २५ ते ३० वर्षीय युवकाचा खून करून फेकून दिलेले

मृतदेह आढळल्याने खळबळ
उस्मानाबाद : तालुक्यातील शिंगोली शिवारातील रेल्वे पटरीच्या परिसरात असलेल्या शेतात एका अनोळखी २५ ते ३० वर्षीय युवकाचा खून करून फेकून दिलेले व अर्धवट अवस्थेत जळालेले प्रेत आढळून आले़ ही घटना गुरूवारी सकाळी समोर आली असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील शिंगोली शिवारातील रेल्वे पटरीजवळ सुरेश किसन क्षीरसागर यांचे शेत आहे़ सुरेश क्षीरसागर यांच्या शेतात गुरूवारी सकाळी एका २५ ते ३० वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला़ घटनेची माहिती मिळताच आनंदनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दिगंबर शिंदे, सपोनि एस़जी़जमादार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़ घटनास्थळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती़
घटनास्थळी आढळलेले प्रेत हे अर्धवट अवस्थेत जळालेले दिसून आले़ त्यामुळे त्या युवकाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे पार्थिव जळल्याचा कायास पोलिसांनी बांधला आहे़ पंचनाम्यानंतर पार्थिव जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले़ या प्रकरणी शिंगोलीचे पोलीस पाटील रंगनाथ विनायकराव शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ अधिक तपास सपोनि एस़जी़जमादार हे करीत आहेत़(प्रतिनिधी)