शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

खून झाल्याची बतावणी करून तोतया पोलिसांनी लुटल्या वृद्धेच्या सोन्याच्या पाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:32 IST

मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी केली चोरी

ठळक मुद्देपुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा शिवाजीनगर येथील मेहरसिंग नाईक शाळेजवळील घटना

औरंगाबाद : खून झाल्याची बतावणी करून दोन तोतया पोलिसांनी ७२ वर्षीय महिलेच्या हातातील सुमारे एक लाखाच्या सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने पळविल्या. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथील मेहरसिंग नाईक शाळेजवळ घडली.

पोलिसांनी सांगितले की, शिवाजीनगर येथील कासलीवाल रानवारा येथील रहिवासी सुनंदा सूर्यकांत गरड या रविवारी सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास सामान आणण्यासाठी किराणा दुकानात जात होत्या. मेहरसिंग नाईक शाळेच्या रस्त्याने त्या असताना मोटारसायकलवरून आलेले दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ येऊन थांबले. आम्ही पोलीस आॅफिसर आहोत, पुढे एका ठिकाणी खून झाला आहे, तुम्ही पेपर वाचत नाहीत का, तुमच्या हातातील सोन्याच्या पाटल्या आणि बांगड्या पिशवीत काढून ठेवा, असे ते म्हणाले. त्यांच्यावर विश्वास ठेवून सुनंदा यांनी त्यांच्या उजव्या हातातील ६० हजार रुपये किमतीची पाटली आणि  ३० हजारांची बांगडी काढली आणि पिशवीत ठेवली. यानंतर त्या डाव्या हातातील पाटली आणि बांगडी काढत असताना एका  भामट्याने सुनंदा यांच्या हातातील पिशवी घेत मी गाठ बांधतो, असे म्हणाला. त्यांची नजर चुकवून आरोपींनी त्यांची पाटली आणि बांगडी काढून घेतली. नंतर गाठ बांधून पिशवी त्यांच्याकडे सोपविली आणि आरोपी तेथून दुचाकीने पसार झाले. सुनंदा यांनी पिशवीची गाठ सोडून पाहिली तेव्हा त्यांच्या पिशवीत बांगडी आणि पाटली नसल्याचे त्यांना दिसले. तोतया पोलिसांनी आपला विश्वासघात करून सुमारे लाखाची पाटली आणि बांगडी पळविल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेनंतर त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठून तोतयांविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपास सुरू केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद