घरपट्टी वाढीच्या विरोधात सेनेची स्वाक्षरी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:42 IST2017-09-03T00:42:44+5:302017-09-03T00:42:44+5:30
महापालिकेच्या वतीने घरपट्टी व इतर मालमत्ता करात केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

घरपट्टी वाढीच्या विरोधात सेनेची स्वाक्षरी मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :महापालिकेच्या वतीने घरपट्टी व इतर मालमत्ता करात केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शिवाजी चौक, रायगड कॉर्नर, बसस्टॅन्ड रोड, जागृती मंगल कार्यालय, वसमतरोड आदी ठिकाणी शिवसेना शहर शाखेच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेसाठी पेंडॉल उभे करण्यात आले आहेत. नागरिकांनी येथे येऊन स्वाक्षºया केल्या. २ सप्टेंबर रोजी ४ हजार नागरिकांच्या स्वाक्षºया प्राप्त झाल्याची माहिती शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार यांनी दिली. शिवाजी चौक येथे युवा सेनेचे शहरप्रमुख विशू डहाळे, बाळराजे तळेकर, गणेश मुळे, संदीप पांगरकर, केदार दुधारे, तुषार चोभारकर, अस्लम शेख, अक्षय रेंगे, रामदेव ओझा, किशोर रन्हेर, श्रीकांत पाटील, सचिन गारुडी, धनंजय जोशी, पवन डहाळे, निखिल डहाळे, रायगड कॉर्नर येथे राहुल खटींग, अजय पेदापल्ली, मकरंद कुलकर्णी, मनोज पवार, मनोज अबोटी, स्वप्नील भारती, विजय मराठे, बसस्टॅन्ड भागात उपशहरप्रमुख संभानाथ काळे, अजय कोपलवार, रवि सोगे, किशोर क्षीरसागर आदींनी मोहीम राबविली. ३ सप्टेंबर रोजी रामकृष्णनगर, देशमुख हॉटेल, साखला प्लॉट, भीमनगर आदी ठिकाणी मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मनपाने दिलेल्या नोटीसची झेरॉक्स सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.