सेनेचे प्रमोद खेडकर विजयी

By Admin | Updated: July 1, 2014 00:37 IST2014-07-01T00:32:27+5:302014-07-01T00:37:57+5:30

नांदेड: कैलासनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रमोद (बंडू ) मुरलीधर खेडकर यांनी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला महादेव निमकर यांचा ४२७ मतांनी पराभव करीत विजय मिळविला़

Senate Pramod Khedkar won | सेनेचे प्रमोद खेडकर विजयी

सेनेचे प्रमोद खेडकर विजयी

नांदेड: कैलासनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रमोद (बंडू ) मुरलीधर खेडकर यांनी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला महादेव निमकर यांचा ४२७ मतांनी पराभव करीत विजय मिळविला़ खेडकर यांना २ हजार २९३ तर निमकर यांना १ हजार ८६६ मते मिळाली़
सोमवारी सकाळी ९ पासून श्री गुरू गोविंदसिंघजी स्टेडियम परिसरातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली़ मतमोजणीसाठी चार टेबलची व्यवस्था करण्यात आली होती़ त्यानुसार चार फेऱ्या झाल्या़ प्रत्येक टेबलवर चार मतदान यंत्रातील मतांची मोजणी करण्यात आली़
सकाळी साडेदहा वाजता मतमोजणीचा निकाल घोषीत करण्यात आला़ उमेदवारांना मिळालेले मते पुढील प्रमाणे- अब्दुल अ़ रजाक अ़ वहाबसाब (अपक्ष) - १२, अ‍ॅड़ अनुप श्रीराम आगाशे (अपक्ष) - १३, प्रमोद (बंडू ) खेडकर ( शिवसेना)- २२९३, मंगला महादेव निमकर (इंडियन नॅशनल काँग्रेस ) - १८६६, शेख अफसर शेख बाबु (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) - ११, शेख असलम उर्फ मुन्नाभाई खोकेवाले बनेमियॉ (अपक्ष) - १०९, वाजीद अनवर जागीरदार (इंडियन युनियन मुस्लिम लिग) - १३़ महापालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रथमच नोटाचा अधिकार वापरण्यात आला़ त्यानुसार ४० मतदारांनी नोटाचा वापर केला़ राष्ट्रवादीचा मात्र या निवडणुकीत धुव्वा उडाला असून त्यांच्या उमेदवाराला फक्त ११ मते मिळाली़
या पोटनिवडणुकीसाठी रविवारी ३७़ १ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ एकूण ११ हजार ७७४ पैकी ४ हजार ३५७ मतदारांनी मतदान केले होते़ प्रभागातील १६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली होती़
मतमोजणीसाठी निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त राजेंद्र खंदारे, सहायक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी गुलाम सादेक, शिवाजी डहाळे, गणेशराव आडेराघो, उपअभियंता शिवाजी बाबरे, सुनील देशमुख, दिलीप टाकळीकर, रमेश चवरे आदींनी काम पाहिले़
दरम्यान, प्रमोद खेडकर यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला़ यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, प्रकाश कौडगे, नगरसेवक बाळासाहेब देशमुख, माजी विरोधी पक्ष नेता बाळू खोमणे, श्याम बन, महेश खेडकर, मुकुंद जवळगावकर, प्रविण साले, बिल्लू यादव, विजय बगाटे, पुजारी आदी सहभागी झाले़ (प्रतिनिधी)
४० मतदारांनी केला नोटाचा वापर
शिवसेनेचे प्रमोद (बंडू) खेडकर यांना २ हजार २९३ तर काँग्रेसच्या मंगला निमकर यांना १ हजार ८६६ मते
चार उमेदवारांना मिळाली १३ च्या आत मते
४० मतदारांनी केला नोटाचा वापर
चार फेऱ्यात झाली मतमोजणी

Web Title: Senate Pramod Khedkar won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.