‘लोकमत’ व ‘संकल्प फाऊंडेशन’तर्फे सेमिनार
By Admin | Updated: December 17, 2015 00:18 IST2015-12-17T00:08:21+5:302015-12-17T00:18:04+5:30
औरंगाबाद : लोकमत आणि संकल्प फाऊं डेशनच्या वतीने सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘लिटमस टेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते.

‘लोकमत’ व ‘संकल्प फाऊंडेशन’तर्फे सेमिनार
औरंगाबाद : विद्यार्थ्यांची शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांना तोंड देण्याची मानसिक तयारी व्हावी, या अभिनव उद्देशाने लोकमत आणि संकल्प फाऊं डेशनच्या वतीने सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘लिटमस टेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील जवळपास २५ शाळांच्या ५,००० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. रविवार, दि.२० रोजी सातवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमातच लिटमस टेस्ट विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. यश मिळविणाऱ्या गुणी विद्यार्थ्यांना भरघोस बक्षिसे मिळतील. प्रत्येक इयत्तेतून तीन क्रमांक काढण्यात येतील. पहिल्या क्रमांकाला आकर्षक टॅब्लेट, दुसऱ्या क्रमांकाला सायकल, तर तिसरा क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्याला मनगटी घड्याळ देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे. लोकमत लॉन्स, लोकमत भवन, औरंगाबाद येथे सायं. ५ वा. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कॅम्पस क्लबचे सदस्य नसणारे विद्यार्थीसुद्धा आपल्या पालकांसोबत या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. प्रवेश मागील गेटने देण्यात येईल याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क - ८८८८८५३४८९, ७७२००३७४१५, ९८८११९६६७०.
‘आपले मूल ज्या कोर्सला जाते, तेथे त्याला इंटेलिजन्ट रोबोट बनविणार की स्मार्ट ह्युमन?’ असा सेमिनारचा विषय असेल. संकल्प फाऊंडेशनचे संचालक रजत पाणी उपस्थितांना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. रजत पाणी हे एन.आय.टी., जमशेदपूर येथून बी.टेक. (मेकॅनिकल इंजिनिअर) झाले आहेत. तसेच एस.आय.बी.एम. येथून त्यांनी एम.बी.ए. केले आहे. ते ६ सिग्मा ग्रीन बेल्ट ट्रेनरदेखील आहेत.