दारूविक्री; एकास कारावास
By Admin | Updated: April 1, 2015 00:58 IST2015-04-01T00:53:23+5:302015-04-01T00:58:06+5:30
उस्मानाबाद : अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारूविक्री घाटंग्री येथील एका इसमास उस्मानाबाद येथील प्रथम न्यायदंडाधिकारी एऩसी़बोरफळकर यांनी तीन वर्षे साधी कैद

दारूविक्री; एकास कारावास
उस्मानाबाद : अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारूविक्री घाटंग्री येथील एका इसमास उस्मानाबाद येथील प्रथम न्यायदंडाधिकारी एऩसी़बोरफळकर यांनी तीन वर्षे साधी कैद व २५ हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली़
याबाबत अॅड़ विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता उज्वला इंगळे यांनी दिलेली माहिती अशी की, घाटंग्री येथील भागवत मुरलीधर बल्लाळ हा अवैधरित्या गावठी दारूविक्री करीत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळाली होती़ या माहितीवरून ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोना डी़डी़उगलमुगले यांनी २६ जुलै २०१२ रोजी कारवाई केली़ त्यावेळी बल्लाळ याच्याकडे गावठी हातभट्टी दारू आढळून आली होती़ या प्रकरणी पोना उगलमुगले यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं २०/ २०१२ कलम ६५ (ई) मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणाचा पोना उगलमुगले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणाची प्राथमवर्ग न्यायदडाधिकारी एऩसी़बोरफळकर यांच्या समोर सुनावणी झाली़ यावेळी समोर आलेले पुरावे व विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता उज्वला इंगळे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एऩसी़बोरफळकर यांनी आरोपी भागवत मुरलीधर बल्लाळ यास तीन वर्षे साधी कैद व २५ हजार रूपयांचा दंड व दंड न भरल्यास एक वर्षे साधी कैद, अशी शिक्षा सुनावली़ (प्रतिनिधी)