डाळींब उत्पादक बनले विक्रेते
By Admin | Updated: August 29, 2014 01:28 IST2014-08-29T00:17:30+5:302014-08-29T01:28:15+5:30
केदारखेडा : येथून जवळच असलेल्या वालसा डावरगाव येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारात भाव मिळत नसल्याने त्यांनी थेट रस्त्यावर दुकाने थाटून विक्री सुरु केली आहे.

डाळींब उत्पादक बनले विक्रेते
केदारखेडा : येथून जवळच असलेल्या वालसा डावरगाव येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारात भाव मिळत नसल्याने त्यांनी थेट रस्त्यावर दुकाने थाटून विक्री सुरु केली आहे.
सूर्यकांत संतुकराव वाघ तसेच इतरांनी किरकोळ डाळिंब विक्रीची दुकान केदारखेडा-भोकरदन रस्त्यावरील वनिकरणमध्ये थाटले आहे़
वाघ यांनी अडीच एकर क्षेत्रावर ८५0 डाळिंबाचे झाडे शेततळ्यावरील पाण्यावर जोपसली आहे़ या डाळिंबाच्या क्षेत्रावर मेहनत घेऊन बाग जोपासली. आजरोजी मोठ्या प्रमाणात फळे लगडली आहेत. परंतु हा माल बाजारात ठोक विक्रीसाठी नेला असता व्यापाऱ्यांकडून माती मोल भावाने खरेदी होत आहे. हा भाव शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकरी हातबल झाला आहे. त्यातच यंदा पावसाळ्यात प्रारंभी पाऊस पडला नाही़ नंतर आलेल्या पावसात हवा जास्त असल्याने झाडांना लागलेल्या फळगळ झाली. मोठे नुकसान झाले.
यामुळे वाघ यांनी बाजारपेठ उभी करण्याचा निर्णय घेतला़ केदारखेडा-भोकरदन मुख्य रस्त्यावरील वनिकरण मध्ये किरकोळ डाळिंब विक्रीची दुकान गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांनी थाटली़ शेतकऱ्यांच्या या निर्णयाला ग्राहकही चांगला प्रतिसाद देत आहेत. डाळिंब विक्रीच्या या किरकोळ दुकानावर मुख्य रस्त्याने जाणारे -येणारे दुचाकी,चारचाकीसह ट्रकचालक या डाळिंबाचा येथे थांबून खरेदी करीत आहेत.
काही ट्रकचालक तर दहा ते पंधरा किलो डाळिंब एकाच वेळी खरेदी करीत आहेत. या ठिकाणी दररोज शेतकऱ्यांच्या या दुकानावरुन १५0 ते १६0 किलो डाळिंबाची विक्री होत आहे़ ५0 ते ६0 रुपये किलो प्रमाणे विकल्या जाणाऱ्या या डाळिंबापासून शेतकऱ्याला दररोज ९ते १0 हजार रुपये मिळत आहे़ या शेतकऱ्यांचा आदर्श आणखी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी घेतल्यास त्याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांना होईल हे विशेष़ याविषयी वाघ यांनी सांगितले की, यंदा डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे. यातुलनेत मिळणारा भाव अत्यल्प असल्याने सर्वच उत्पादक धास्तावले आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव रस्त्यावर विक्री करावी लागत आहे. भाववाढीची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)
लोकमतशी बोलताना सूर्यकांत वाघ यांनी सांगितले की, या मालाला बाजारपेठेत अत्यंत कमी भाव मिळत आहे़बाजारात मालाची आवक अधिक झाल्याने व्यापाऱ्यांनी त्यांचा पुरेपूर फायदा घेतला आहे. व्यापारी मालाची कवडीमोल भावाने ते खरेदी करीत आहे़
४डाळिंब जोपासण्याची वेळी या मालाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असताना अपेक्षा भंग झाल्याने आमच्या मालाची विक्री आम्हीच ठरवू. असा निर्धार करुन हे दुकान थाटले़ आम्ही दोन भाऊ आहोत. धाकट्या भावाकडे सुध्दा अडीच एकर डाळींब बाग असल्याने या पूर्ण मालाची आता मात्र ठोक डाळिंब विक्रीची आवश्कता नसून किरकोळ दुकानावरच या मालाची विक्री करेल असा ठाम विश्वास शेवटी वाघ यांनी व्यक्त केला़