जयश्री कुलकर्णी यांच्याकडून आत्मदहनाचा इशारा

By Admin | Updated: August 13, 2016 00:04 IST2016-08-13T00:02:27+5:302016-08-13T00:04:46+5:30

औरंगाबाद : महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री कार्यालयास पत्र पाठवून आपण आत्मदहन करणार असल्याचे नमूद केले आहे.

Self-Hitting Warning From Jayashree Kulkarni | जयश्री कुलकर्णी यांच्याकडून आत्मदहनाचा इशारा

जयश्री कुलकर्णी यांच्याकडून आत्मदहनाचा इशारा

औरंगाबाद : महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री कार्यालयास पत्र पाठवून आपण आत्मदहन करणार असल्याचे नमूद केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाला ही बाब शुक्रवारी कळविल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्या विरोधात महापालिकेतील सर्व डॉक्टरांनी बंड केले होते. प्रशासनाने त्यांना रजेवर जाण्याचा सल्ला दिला होता. कुलकर्णी यांच्या जागेवर मनपाने शासनाकडून आरोग्य वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर मागवून घेतला. मागील ११ महिन्यांपासून कुलकर्णी मला रुजू करून घ्या, अशी मागणी प्रशासनाकडे करीत आहेत. प्रशासन त्यांना रुजू करून घेण्यास नकार देत आहे. शिवाय त्यांना अकरा महिन्यांपासून पगारही देण्यात आला नाही. कुलकर्णी यांनी यासंदर्भात खंडपीठातही धाव घेतली. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयास आपण आत्मदहन करणार असल्याचे पत्र पाठविले. शुक्रवारी दिवसभर मनपा प्रशासन धमकीमुळे त्रस्त झाले होते.

Web Title: Self-Hitting Warning From Jayashree Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.