२५ गावांची जलयुक्त शिवारसाठी निवड
By Admin | Updated: April 11, 2017 00:15 IST2017-04-11T00:12:43+5:302017-04-11T00:15:21+5:30
भोकरदन : तालुक्यातील २५ गावांची सन २०१७- १८ साठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी निवड करण्यात आली आहे़

२५ गावांची जलयुक्त शिवारसाठी निवड
भोकरदन : तालुक्यातील २५ गावांची सन २०१७- १८ साठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी निवड करण्यात आली आहे़ तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांनी भोकरदन तालुक्यातील २५ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड केली आहे. गावांची निवड करून ती नावे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली होती.
त्यानुसार जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी तालुक्यातील वाकडी, कोठा कोळी, कोळेगाव, कठोरा जैनपुर, क्षिरसागर, आलापुर, भिवपुर, पंढरपुर, चांदई ठोंबरी, नळणी बु, कोपर्डा, सोयगाव देवी, थिगळखेडा, खामखेडा, पारध बु, शेलुद,सिरजगाव वाघृळ, खडकी, पळसखेडा दाभाडी, सुरंगळी, हसनाबाद, तपोवन, चांदई एक्को, उमरेखडा, जानेफळ दाभाडी, या २५ गावाची निवड करण्यात आली आहे. तर गेल्या दोन वर्षामध्ये तालुक्यातील २०१५ - १६ मध्ये ३४ गावे तर २०१७ -१७ मध्ये ३१ गावे अशा एकूण ६५ गावांची निवड जलयुक्त शिवार योजने मध्ये निवड करण्यात आली होती. त्या गावांपैकी ६० टक्के गावामध्ये जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. मात्र ४० टक्के गावांची केवळ निवड झाली आहे. या गावांमध्ये जलयुक्तची कामे समाधान कारक करण्यात आली नाही. त्याला कोण जबाबदार आहे याच्या आत्मपरिक्षणाची गरज आहे. मात्र ६५ गावांपैकी ठराविक गावांमध्येच जलयुक्तची कामे करण्यात आली आहे. ज्या गावांत जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली अशा गावांमध्ये पाणी पुरवठ्याचे टँकर देऊ नये, असे निर्र्देश आहेत. तर गेल्या दोन वर्षांत ज्या गावात जलयुक्तची कामे झाली अशा गावांत सुध्दा पाणीटंचाई निर्माण झाली आहे. (वार्ताहर)