जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची निवड गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 00:47 IST2017-01-25T00:45:46+5:302017-01-25T00:47:50+5:30
भोकरदन : जालना जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची जानेवारी महिन्यामध्ये करण्यात येणारी निवड गुलदस्त्यात आहे़

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची निवड गुलदस्त्यात
भोकरदन : जालना जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची जानेवारी महिन्यामध्ये करण्यात येणारी निवड मात्र यावेळी गुलदस्त्यात आहे़
भाजपा- सेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या हिताचा असलेला जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. येणाऱ्या पाच वर्षांमध्ये राज्यातील सर्वच गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा सुध्दा केली आहे. २०१५ - १६ मध्ये जिल्ह्यातील सुमारे २१५ गावांची पहिल्या टप्प्यामध्ये जलयुक्त शिवारमध्ये गावांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ - १७ मध्ये सुध्दा १९२ च्या जवळ पास गावांची दुसऱ्या टप्यामध्ये जलयुक्त शिवार योजने मध्ये गावांची निवड करून या गावामध्ये जलयुक्तच्या माध्यमातून सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याचे मोठे काम करण्यात आले होते. भोकरदन तालुक्यात जलयुक्त शिवार अभियाना सह सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सिंचनक्षेत्र वाढीचे काम करण्यात आले. भोकरदन तालुक्यात २०१५ - १६ मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये १५६ गावांपैकी ३४ गावांची जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड करण्यात आली होती. तर २०१६ -१७ मध्ये ३१ गावांची निवड करण्यात आली होती. तालुक्यात गेल्या दोन वर्षा मध्ये ६५ गावांमध्ये ही योजना यशस्वीपणे राबविल्या गेली असली तरी ३५ ते ४० गावांमध्येच चांगली कामे झाली. या गावामध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. गेल्या दहा वर्षानंतर पहिल्यांदाच ३९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे जलयुक्त शिवार अभियानामुळे २० हजार हेक्टर क्षेत्राची वाढ झाली आहे. खोलीकरण कामांत चांगला जलसाठा झाला आहे.