मर्मबंधा गव्हाणे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:02 IST2021-06-05T04:02:16+5:302021-06-05T04:02:16+5:30

औरंगाबाद : सिनेमा क्षेत्रातील पटकथालेखक, गीतकार व नाटककार यांच्या ‘स्क्रीनरायटर्स असोसिएशन’ या अधिकृत संघटनेच्या कार्यकारी समितीवर मराठवाड्यातील पटकथा लेखिका ...

Selection of Marmabandha Gawhane | मर्मबंधा गव्हाणे यांची निवड

मर्मबंधा गव्हाणे यांची निवड

औरंगाबाद : सिनेमा क्षेत्रातील पटकथालेखक, गीतकार व नाटककार यांच्या ‘स्क्रीनरायटर्स असोसिएशन’ या अधिकृत संघटनेच्या कार्यकारी समितीवर मराठवाड्यातील पटकथा लेखिका मर्मबंधा गव्हाणे यांचे नामांकन करण्यात आले आहे. या संघटनेचे देशभरात सुमारे ३० हजार सदस्य असून लेखक पटकथेची नोंदणी संघटनेच्या या कार्यालयात केली जाते. प्रसिद्ध पटकथा लेखक व गीतकार या संघटनेचे सदस्य आहेत. गेल्या ७० वर्षांपासून कार्यरत ही संघटना पटकथा लेखक, गीतकार, नाटककार व लेखक यांच्या बौद्धिक संपदा हक्कांचे (इंटीलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटस) संरक्षण करणे, निर्माते व पटकथा लेखक व गीतकार यांच्या विवादाचा आपसात निवाडा करणे, निर्मात्यांसोबत करारांचा मसुदा तयार करणे, नव्या पटकथा लेखकांना प्रशिक्षण देणे आदी उपक्रम घेते. पूर्वी या संघटनेचे नाव ‘फिल्म रायटर्स असोसिएशन’ असे होते. चित्रपट, टीव्ही, रेडिओ, जाहिरात व डिजिटल माध्यमांचे लेखक या संघटनेचे सदस्य आहेत.

Web Title: Selection of Marmabandha Gawhane