अतिरिक्त आयुक्त पदाची निवड शासनाला अमान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:04 IST2021-07-22T04:04:32+5:302021-07-22T04:04:32+5:30
महापालिका आयुक्तांच्या नावे पाठवण्यात आलेल्या पत्रात शासन निर्णय दिनांक ६ जानेवारी २०१५ मधील परिच्छेद ३(१) मधील पात्रतेच्या निकषानुसारच अतिरिक्त ...

अतिरिक्त आयुक्त पदाची निवड शासनाला अमान्य
महापालिका आयुक्तांच्या नावे पाठवण्यात आलेल्या पत्रात शासन निर्णय दिनांक ६ जानेवारी २०१५ मधील परिच्छेद ३(१) मधील पात्रतेच्या निकषानुसारच अतिरिक्त आयुक्त पदावरील पदोन्नतीने निवड करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात यावा, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
उपायुक्त रवींद्र निकम यांची आयुक्तांनी काही महिन्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त या पदावर पदोन्नतीने निवड केली होती. निकम यांना अतिरिक्त आयुक्त हे पदनामदेखील देण्यात आले. पदोन्नतीने निवड केल्यानंतर निवडीचा हा प्रस्ताव शासनाच्या नगर विकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाच्या संदर्भात नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी प्रदीप पाटील यांनी महापालिका आयुक्तांच्या नावे पत्र पाठवले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील महापालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण करणे व ही पदे भरण्यासाठीच्या कार्यपद्धतीसंदर्भात ६ जानेवारी २०१५ च्या शासन निर्णयात निकष निश्चित करण्यात आले आहेत. आयुक्तांनी पाठवलेल्या प्रस्तावात या निकषांची पूर्तता होताना दिसत नाही. त्यामुळे निकषानुसार प्रस्ताव सादर करण्यात यावा. महापालिकेत दोन अतिरिक्त आयुक्त आहेत. एका पदावर शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. दुसऱ्या पदावर मनपातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीने अतिरिक्त आयुक्त पदनाम नेमता येते. अलीकडेच अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी एक बैठकही घेण्यात आली; मात्र या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही.