जप्त केलेली वाळू गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:50 IST2017-09-17T00:50:43+5:302017-09-17T00:50:43+5:30

जप्त केलेल्या या साठ्यातून वाळू माफियांनी काही वाळू दुसºयाच दिवशी गायब करत महसूल विभागाला आव्हान दिले.

 The seized sand disappears | जप्त केलेली वाळू गायब

जप्त केलेली वाळू गायब

लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : मंठा तालुक्यातील कानडी येथे सात ब्रास अवैध वाळू साठा १० सप्टेंबर रोजी जप्त करण्यात आला होता . जप्त केलेल्या या साठ्यातून वाळू माफियांनी काही वाळू दुसºयाच दिवशी गायब करत महसूल विभागाला आव्हान दिले. परंतु महसूल विभागाकडुन कोणतीच कारवाई झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .
कानडी फाटा ते गावापर्यत रस्त्यावर पूलाजवळ अंदाजे ३० ते ४० ब्रास व स्मशानभूमीजवळ अंदाजे २० ते ३० ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला होता. ही कारवाई तलाठी एन. एस. चिंचोले यांनी केली होती . तसेच जप्त केलेला वाळु साठा कोतवाल घोडे यांच्या ताब्यात दिला होता. सोमवारी कोतवाल घोडे यांना जप्त केलेल्या वाळू साठा गायब झाल्याचे दिसून आले. घोडे यांनी चिंचोले यांना माहिती दिली. मात्र, अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नसल्याने वाळु माफियांचे मनोबल वाढले आहे. याबाबत तलाठी एन. एस. चिचोले म्हणाले, ज्यांनी वाळू साठा पळविला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

Web Title:  The seized sand disappears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.