नांदेडमधून चोरीस गेलेला पोकलेन केजमध्ये जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 22:43 IST2017-01-17T22:42:30+5:302017-01-17T22:43:57+5:30
केज : नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर येथून चोरीस गेलेल्या २५ लाख किंमतीचा पोकलेन मंगळवारी तालुक्यातील शिंदी फाट्यावर आढळून आला.

नांदेडमधून चोरीस गेलेला पोकलेन केजमध्ये जप्त
केज : नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर येथून चोरीस गेलेल्या २५ लाख किंमतीचा पोकलेन मंगळवारी तालुक्यातील शिंदी फाट्यावर आढळून आला.
एका कंत्राटदाराने भाडेतत्वावर तेलंगणा येथून आणलेले पोकलेन शुक्रवारी इस्लापूर येथून चोरांनी पळविले होते. याप्रकरणी इस्लापूर पोलिसांत फिर्याद नोंद झाली होती. दरम्यान, केज तालुक्यातील शिंदी परिसरात पोकलेन असल्याची माहिती मिळाल्यावरुन केज पोलिसांनी तो जप्त केला. याची माहिती इस्लापूर पोलिसांना कळविण्यात आली आहे. (वार्ताहर)