शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

खाजगी बसमधून गावठी कट्टा जप्त; पार्सलचे १०० रुपये चालक-वाहकाला पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 14:22 IST

अनोळखी व्यक्तीकडून पार्सल घेणे चालक-वाहकाला पडले महागात  

खुलताबाद (औरंगाबाद ) :  चाळीसगाव ते पुणे जाणाऱ्या एका खाजगी बसमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतूस जप्त केले. सोमवारी (दि.६ ) रात्री १२ वाजेच्या सुमारास खुलताबादेत बसच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चालक- वाहकाला अटक करण्यात आली असून पार्सल देणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास चाळीसगाव ते पुणे ( व्हाया औरंगाबाद) जाणाऱ्या सरस्वती ट्रँव्हल्स कंपनीच्या बसमध्ये ( क्रमांक एम.एच.20 ई.जी. 1276 )  बेकायदेशीररित्या गावठी कट्टा ( पिस्टल) आणि जिवंत काडतुसचे पार्सल असल्याची माहिती मिळाली. यावरून खुलताबाद येथे वेरूळ टी पॉईंटला सापळा रचून पथकाने बसला अडवले. यानंतर तपासणीत चालकासमोर एका पिशवीतील खोक्यात गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतूस आढळून आली. यावेळी चालकाने चाळीसगाव येथे एका अनोळखी व्यक्तीने यात देवीची मूर्ती असून ती पुण्यात देयची असल्याची सांगितले. पार्सलवर पुण्यातील व्यक्तीचा मोबाईल क्रमांक लिहून यासाठी त्याने १०० रुपये दिल्याची माहिती त्याने दिली. 

यानंतर पोलिसांनी चालक शेख बद्रोद्दीन शेख अलीमोद्दीन ( 40, रा. नवागाव, चाळीसगाव) व वाहक समाधान दगडू मोरे (23 रा.देवळी ता.चाळीसगाव ) यांना ताब्यात घेतले. तसेच चालक-वाहक आणि पार्सल देणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुभाष  भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ गणेश मुळे, दिपेश नागझरे, नदीम शेख, बाबा नवले यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस