सुरक्षेवरून अधिकाऱ्यांना झाप-झाप झापले

By Admin | Updated: July 3, 2016 00:33 IST2016-07-02T23:55:22+5:302016-07-03T00:33:11+5:30

लातूर : लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे ‘लोकमत’ चमूने मंगळवारी स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर

Security officials jumped to safety | सुरक्षेवरून अधिकाऱ्यांना झाप-झाप झापले

सुरक्षेवरून अधिकाऱ्यांना झाप-झाप झापले


लातूर : लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे ‘लोकमत’ चमूने मंगळवारी स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल प्रादेशिक परिवहन अधिकारी पी़जी़ भालेराव यांनी घेतली़ ‘लोकमत’चे स्टींग गांभीर्याने घ्या़ उद्या कोणीही येईल, कार्यालयात घुसेल, तुमच्या खुर्चीत बसेल, आरटीओंच्या खुर्चीत बसेल, स्वत: दक्ष राहून कार्यालयाची सुरक्षा राखा़, असे फर्मान शनिवारी काढले़
विभागीय दर्जाच्या कार्यालयातील सुरक्षेचा आढावा ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशननंतर भालेराव यांनी घेत कार्यालयातील सुरक्षा आणि शिस्तीबाबत ठोस निर्णय घेतला आहे़ कार्यालयात असणाऱ्या सीसीटीव्ही आणि इतर यंत्रणा अपडेट करण्याच्या सूचनाही संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत़ ‘लोकमत’च्या चमूने मंगळवारी विभागीय दर्जाच्या कार्यालयातील सुरक्षा कशी वाऱ्यावर याबाबतचा सचित्र वृत्तांत प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती़ केवळ कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे कार्यालयीन सुरक्षेचे कसे तीनतेरा होतात, हेच ‘लोकमत’ने आपल्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे़
‘लोकमत’च्या स्टींगनंतर शनिवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची व्यापक बैठक पी़जी़ भालेराव यांनी घेत कर्मचारी व अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत झाडाझडती घेतली़ भविष्यात कार्यालयीन सुरक्षेबाबत असा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही ते म्हणाले़
महापालिकेसह प्रादेशिक परिवहन कार्यालयात कुणीही येऊन कोणाच्याही टेबलवर हस्तक्षेप करतं़ ही बाब निदर्शनास आल्यानंतर ‘लोकमत’ने हे स्टींग केले होते़ आरटीओसारख्या जबाबदार अधिकाऱ्याच्या कार्यालयातही चालणारा हा गलथानपणा उघड व्हावा़ त्यात खुद्द त्यांचेच दालन त्यांच्या गैरहजेरीत कसे बेवारस होते हे ‘लोकमत’ने दाखवून दिले होते़ महापालिकेने यानंतर तातडीने या स्टींगची दखल घेऊन ओळखपत्र आणि ड्रेसकोड केले़ आता लक्ष आरटीओ कार्यालयाकडे होते़ अखेर शनिवारी आरटीओंनी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कार्यालयाच्या सुरक्षेवरून सक्त सूचना केल्या़ आरटीओच्या खुर्चीत बसले तरी तुम्ही काय करत होता, असा सवाल कर्मचाऱ्यांना करून कार्यालयाच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करा, अशा सूचना केल्या़
१८३ काळी-पिवळीच्या परवाना निलंबनाकडे लक्ष़़़
४जिल्हा पोलिस अधिक्षकांनी १८३ काळी-पिवळीवर वाहन परवाना निलंबित करण्याच्या कारवाई संदर्भात प्रस्ताव केला आहे़ या प्रस्तावावर भालेराव काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागले आहे़

Web Title: Security officials jumped to safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.