नादुरुस्त बसगाड्यांमुळे सुरक्षितता धोक्यात

By Admin | Updated: May 11, 2015 00:34 IST2015-05-11T00:08:40+5:302015-05-11T00:34:01+5:30

सोमनाथ खताळ , बीड सुरक्षित प्रवासाचे दावे करणारे एसटी महामंडळ नादुरुस्त बसगाड्यांद्वारे प्रवाशांची ने- आण करत असल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली आहे. आठ तासांत दोन बसगाड्यांचा अपघात झाला.

Security hazards due to bad buses | नादुरुस्त बसगाड्यांमुळे सुरक्षितता धोक्यात

नादुरुस्त बसगाड्यांमुळे सुरक्षितता धोक्यात


सोमनाथ खताळ , बीड
सुरक्षित प्रवासाचे दावे करणारे एसटी महामंडळ नादुरुस्त बसगाड्यांद्वारे प्रवाशांची ने- आण करत असल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली आहे. आठ तासांत दोन बसगाड्यांचा अपघात झाला. या गाड्यांचे दुरुस्ती काम (मेंटेनन्स) व्यवस्थित न झाल्याने अपघात झाल्याचा सूर चालकांमधून उमटत आहे तर अधिकाऱ्यांनी मात्र रस्ता व वाहकाला दोषी धरले आहे. कोलमडलेले वेळापत्रक, स्थानकांची ुदुरवस्था व खटारा बसगाड्या... यामुळे सामान्यांची लालपरी ‘समस्या’पूरच्या दिशेने धावू लागली आहे.
शनिवारी रात्री आठच्या सुमारास शिरूर नदीजवळ (अहमदनगर) व रविवारी सकाळी बीडजवळील तळेगाव फाट्याजवळ बीड आगाराच्या दोन बसगाड्यांचा अपघात झाला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातास नेमके कारण काय होते ? याची कारणमिमांसा काढली असता बसगाड्या नादुरूस्त असल्याचे समजले. अनेक बसगाड्यांचे ब्रेकचे प्रॉब्लेम स्टेअरिंगही जाम जात असल्याचे चालकांनी सांगितले. या खटाऱ्या बसगाड्यांमधून प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणी येतात. एवढेच नव्हे तर चालकांना सुद्धा याचा मोठा त्रास होतो. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांमधून केला जात आहे. अपघातांबद्दल यांत्रिक अभियंता के. एस. लांडगे म्हणाले, आमच्या सर्व गाड्या दुरूस्त आहेत. चालक काही पण सांगतात. आम्ही रोज चेकिंग करतो, असेही त्यांनी सांगितले.
ब्रेक-हॉर्न, एका बाजूला ओढणे, पॉवर स्टेअरिंग असून सुध्दा जाम होणे, वायपर बंद, गिअर बॉक्स व्यवस्थित नाही आदी समस्यांचा पाढा चालकांनी ‘लोकमत’समोर वाचून दाखविला.

Web Title: Security hazards due to bad buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.