अपुऱ्या पोलिसांमुळे सुरक्षेची एैशी की तैशी
By Admin | Updated: June 25, 2014 01:05 IST2014-06-25T00:09:41+5:302014-06-25T01:05:58+5:30
बदनापूर : पोलिस ठाण्यात असलेल्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे पोलिसांवर ताण तर वाढतच शिवाय सुरक्षाही नागरिकांच्या सुरक्षेची एैसी की तैसी झाली आहे.

अपुऱ्या पोलिसांमुळे सुरक्षेची एैशी की तैशी
बदनापूर : पोलिस ठाण्यात असलेल्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे पोलिसांवर ताण तर वाढतच शिवाय सुरक्षाही नागरिकांच्या सुरक्षेची एैसी की तैसी झाली आहे.
बदनापूर पोलिस ठाणे महामार्गावर आहे. या ठाण्याअंतर्गत ८५ खेड्यापाड्यातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेचे कामकाज चालते. दिवसेंदिवस या पोलीस ठाण्याअंतर्गत कामकाज वाढत असले तरी या ठाण्यातील पोलिस कर्मचा-यांची संख्या निजामकालीनच आहे. येथे उपलब्ध असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी दोन पोलीस ठाणे अंमलदार, दोन आरटीपीसी, एक मोहरील, एक गुप्त वार्ता विभाग,एक पोलीस निरीक्षक रायटर, एक साप्ताहिक रजा, दोन दाभाडी पोलीस चौकीत, एक कोर्ट, एक रिफ्रेशर कोर्स साठी अशा प्रकारे दैनंदिन कामकाजासाठी पोलीस लागतात. तसेच या शिवाय शहरातील रात्रीची गस्त, जालना-औरंगाबाद महामार्गावर होणारे अपघात, या महामार्गावरून जाणारे मंत्री व इतर महत्वाच्या पेट्रोलिंग, आरोपी लॉकअप् गार्ड या कामांनाही पोलीस कर्मचारी लागतात. अशाप्रकारे उपलब्ध कर्मचाऱ्यांपेक्षा अर्धेपेक्षा जास्त कर्मचारी या कामांमध्येच व्यस्त असतात. येथे एकच वाहनचालक आहे. आणखी एका वाहनचालकाची आवश्यकता आहे. त्यामुळे दैनंदिन दाखल होणा-या गुन्ह्यांचा तपास, कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटना,प्रलंबित गुन्हे अशा अनेक कामांना पोलीस कर्मचारी कमी पडतात. कर्मचा-यांची संख्या कमी असल्यामुळे अनेक कर्मचा-यांना २४ घंटे नोकरी करावी लागते. आपल्या कुटुंबालाही वेळ देता येत नाही.अनेक पोलिसांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे शहरातील रात्रीची गस्तही ढेपाळली आहे. हे शहर महामार्गावर रेल्वे मार्गावर असल्यामुळे येथे रात्रीबेरात्री अनेक सराईत गुन्हेगार चोरटे येऊन चो-या करतात. यापूर्वी बदनापूर शहरात झालेल्या वाढत्या चो-यांच्या निषेधार्थ शहरातील व्यापारी व जनता रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर तात्कालीन पोलीस अधीक्षक मोहिते यांनी ठाण्यात गावक-यांसोबत झालेल्या चर्चेत वाढीव पोलीस देण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसाकरिता त्यांनी हे आश्वासन पाळलेही मात्र आता या पोलीस ठाण्यात पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे शहरातील व तालुक्यातील रात्रीच्या गस्तीवर याचा परिणाम होत आहे.
यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. नुकतेच शहरात गोडतेल चोरी टोळी सक्रिय झाली आहे. चोवीस तास वर्दळ असणा-या महामार्गावरील न्यू आशीर्वाद किराणा दुकानासमोरून दोनदा एकूण १० गोडतेलाचे ड्रम चोरीला गेले आहेत.
त्याच रात्री पोलीस ठाण्याशेजारील जैन किराणाचे दोन व बाजार गल्लीतील संदीप किराणा एक अशा तीन गोडतेल टाक्या चोरून चोरटयांनी कमालच केली आहे तसेच तालुक्यातील धोपटेश्वर, कडेगाव, देवगाव या शिवारातुन नुकतीच बैलचोरी झाली आहे. या चो-यांचा तपास अद्यापही पोलीसांकडून लागलेला नाही.
त्यामुळे जिल्हयातील इतर पोलीस ठाण्याप्रमाणे बदनापूर पोलीस ठाण्यातही कर्मचारी संख्या वाढवावी जेणेकरून जनतेची सुरक्षा वेळेत होईल अशी अपेक्षा या तालुक्यातून व्यक्त होत आहे. रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थ तसेच व्यापाऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)
व्हीआयपींमध्ये कर्मचारी व्यस्त
मंत्री व इतर महत्वाच्या पेट्रोलिंग, आरोपी लॉकअप् गार्ड या कामांनाही पोलीस कर्मचारी लागतात. अशाप्रकारे उपलब्ध कर्मचाऱ्यांपेक्षा अर्धेपेक्षा जास्त कर्मचारी व्यस्त असतात.
बदनापूर पोलिस ठाणे महामार्गावर आहे. या ठाण्याअंतर्गत ८५ खेड्यापाड्यातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेचे कामकाज चालते. दिवसेंदिवस या पोलीस ठाण्याअंतर्गत कामकाज वाढत असले तरी या ठाण्यातील पोलिस कर्मचा-यांची संख्या निजामकालीनच आहे.